Farmer Success Story : शेतकरी बनला बटाटा किंग! 70 दिवस, 1700 क्विंटल बटाटा, 28 लाखांचे उत्पन्न; वाचा यशोगाथा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील सोनवणे कुटुंबाने पारंपरिक शेतीला फाटा देत नवा प्रयोग केला आणि अवघ्या 70 दिवसांत मोठे उत्पन्न मिळवले. 16 एकर जमीन बटाट्याच्या पिकासाठी वापरून तब्बल 1,750 क्विंटल उत्पादन घेतले आणि 28.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
जालना : भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील सोनवणे कुटुंबाने पारंपरिक शेतीला फाटा देत नवा प्रयोग केला आणि अवघ्या 70 दिवसांत मोठे उत्पन्न मिळवले. 16 एकर जमीन बटाट्याच्या पिकासाठी वापरून तब्बल 1,750 क्विंटल उत्पादन घेतले आणि 28.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
शेतीतील नवा प्रयोग कसा केला?
खंडाळा येथील विलास शेषराव सोनवणे हे शिक्षक असून त्यांचा लहान भाऊ दामोदर सोनवणे, आई कुशीवर्ताबाई, पत्नी सविता सोनवणे आणि भावजय मनीषा सोनवणे यांनी मिळून गट क्रमांक 215 मधील 20 एकर शेती सांभाळली. त्यांनी 16 एकर क्षेत्रात पुणे येथून पुखराज जातीच्या बटाट्याचे 160 क्विंटल बेणे 3,000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून 3 नोव्हेंबर रोजी लागवड केली.
advertisement
यशस्वी उत्पादनासाठी घेतलेले पाऊल
24 जानेवारीपासून हार्वेस्टिंग सुरू झाल्यावर केवळ 8 एकर शेतीतून 900 क्विंटल उत्पादन मिळाले. याला 1,600 ते 1,700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. उर्वरित उत्पादन लवकरच काढण्यात येईल. बटाटे जळगावच्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत.
शेतीत नवे प्रयोग महत्त्वाचे ठरले
सोनवणे कुटुंबाने याआधी पारंपरिक शेती केली होती. मात्र, आधुनिक शेतीच्या तंत्राचा अवलंब करून त्यांनी मोठा नफा मिळवला शेतीतील नवनवे प्रयोग स्वीकारले तरच शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल अशी त्यांची भावना आहे.आणि हे त्यांनी करून दाखवले आहे.
advertisement
मिरची पिकाने कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
3 वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीमुळे सोनवणे कुटुंबावर 22 लाखांचे कर्ज झाले होते. मात्र, 2023 मध्ये त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि 67 लाखांची मिरची विक्री करून कर्जमुक्ती मिळवली. पुढे जाऊन मिरची खराब झाल्यानंतर त्यांनी 16 एकर शेतीत बटाट्याचा प्रयोग केला आणि पहिल्याच वेळी 110 क्विंटल प्रति एकर उत्पादन घेऊन यश मिळवले.
advertisement
बटाट्याचे यशस्वी उत्पादन कसे साध्य केले?
view commentsसोनवणे यांनी जमिनीची योग्य तयारी ,ठिबक सिंचन व आधुनिक खत व्यवस्थापन, पोटॅशयुक्त खते आणि बुरशीनाशकांची योग्य फवारणी, उत्तम नियोजन व बाजारपेठेचा अभ्यास हा महत्वाचा ठरला
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2025 8:03 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story : शेतकरी बनला बटाटा किंग! 70 दिवस, 1700 क्विंटल बटाटा, 28 लाखांचे उत्पन्न; वाचा यशोगाथा










