APMC Market Rate: मकरसंक्रांत यंदा होणार कडू, गुळाचे दर वाढले; राज्यभरातल्या बाजारात भाव किती?

Last Updated:

बुधवार, दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.

+
गुळास

गुळास चांगला उठाव 

मुंबई: बुधवार, दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3287 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली मार्केटमध्ये 1382 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4330 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 799 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याची आवक कमीच: राज्याच्या मार्केटमध्ये आज 104 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 37 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 25000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 क्विंटल शेवग्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे भाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1409 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 576 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 4750 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 424 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 14500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate: मकरसंक्रांत यंदा होणार कडू, गुळाचे दर वाढले; राज्यभरातल्या बाजारात भाव किती?
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement