Onion Rate: सोलापूर कांदा मार्केटमधून महत्त्वाचं अपडेट, आवक घटली, किती मिळतोय कांद्याला दर?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Onion Rate: सोलापूर मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये निम्म्याने आवक कमी झाली आहे. तर दरांमध्ये मोठे बदल जाणवत आहेत.
सोलापूर: एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे कांद्याचे दर वाढत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज कांद्याची 100 ते 105 गाड्या कांद्याची आवक होत आहे. मात्र, त्याला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. याबाबत सोलापुरातील कंदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही काळात कांद्याची आवक घटली आहे. मात्र, कांद्याच्या दरांतही घट कायम आहे. सध्या कांद्याला सरासरी 12 ते 14 रुपये किलो दर मिळत आहे. तर चांगल्या कांद्याला 1600 ते 1800 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत कांद्याच्या दरात 500 रुपयांची घट झाली आहे, असे कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी सांगितले.
advertisement
पूर्वी महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन जास्त होते. तर इतर राज्यात कांदा मिळत नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्याण केली जात होती. पण या वेळे कर्नाटकातील काही जिल्ह्यांत कांद्याची शेती वाढली आहे. तसेच काही राज्यांत कांदा साठवून ठेवला जात आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील कर्नाटकमध्ये कांद्याची मागणी घटली आहे, असेही बागवान यांनी सांगितले.
advertisement
ज्यावेळेस कांद्याला मागणी असते त्यावेळेस सरकार निर्यात शुल्क लावते आणि ज्यावेळेस कांद्याला मागणी नसते, त्यावेळेस शुल्क हटवले जाते किंवा कमी होते. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून कांद्याची निर्यात तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यात होत आहे. दरम्यान, मागील वर्षी जुलै महिन्यात 200 ते 250 गाड्या कायद्याचे आवक होती आणि त्यावेळेस कांद्याला योग्य भाव देखील मिळत होत, असेही कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी सांगितले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 18, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Onion Rate: सोलापूर कांदा मार्केटमधून महत्त्वाचं अपडेट, आवक घटली, किती मिळतोय कांद्याला दर?