Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Sharad Mango: शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे उत्पादन केले आहे. त्या आंब्याचं नाव त्यांनी शरद आंबा ठेवले आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे उत्पादन घेतले आहे. त्या आंब्याचं नाव त्यांनी शरद आंबा ठेवले आहे. याबाबत शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी माहिती दिली.
शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना फळबाग योजना आणली होती. त्याच योजनेतून आम्ही 8 एकर शेतजमिनीत जवळपास 10 हजार केशर आंब्याची रोप लावली आहेत. या अडीच ते तीन किलोच्या आंब्याला शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले आहे. अडीच ते तीन किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी आम्ही एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले.
advertisement
त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले. होमिओपॅथीचे विविध औषधांचा वापर केला. प्रथमच अडीच ते तीन किलोचा आंबा उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना दाखवले, असे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी माहिती देताना सांगितले.
शरद मँगोचा ही मिळाला पेटंट
माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे नवीन वाण बनवले आहे. या अडीच ते तीन किलोच्या आंब्याला शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले आहे. या नावाचं पेटंट सुद्धा शेतकरी दत्तात्रय गाडगे यांना मिळाला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 22, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!