एकदाच दीडशे झाडांची लागवड, शेतकऱ्यानं मिळवला 15 लाख नफा, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
8 ते 10 वर्षांपासून ते लिबांची शेती करत आहेत. या लिंबाच्या शेतीतून ते वर्षाला 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत.
सोलापूर : अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसतायेत. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न काढत आहेत. अशाच प्रकारची शेती दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी या गावातील शेतकरी महादेव कलप्पा चेंडके यांनी केली आहे. 8 ते 10 वर्षांपासून ते लिबांची शेती करत आहेत. या लिंबाच्या शेतीतून ते वर्षाला 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी महादेव चेंडके यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगरी या गावातील शेतकरी महादेव कलप्पा चेंडके हे केलेल्या 8 ते 10 वर्षांपासून लिंबूची शेती करत आहेत. एका एकरात महादेव यांनी दीडशे लिंबूच्या झाडांची लागवड केली आहे. लिंबूची शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच आहे कारण या लिंबूच्या झाडांवर कुठल्याही प्रकारची रोगराई येत नाही. त्यामुळे फवारणीचा खर्च वाचतो. तसेच महादेव चेंडके हे त्यांच्या लिंबूच्या बागेला शेणखत वापरतात.
advertisement
लिंबूच्या बागेचे जर व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर वर्षातून दोन ते तीन भार या लिंबूच्या बागेतून घेता येते. तर लिंबूच्या बागेला उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागते. लिंबूच्या बागेला खत, बुरशीनाशक फवारणी, आदी मिळून 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. तर दरवर्षी लिंबू विक्रीतून त्यांना दीड ते दोन लाख रुपयांचा उत्पन्न मिळतो. लिंबूचा बाजार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत असल्यामुळे लिंबूला दर चांगला मिळत आहे.
advertisement
सध्या सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबूला 1000 रुपये ते 1200 रुपये दहा किलो प्रमाणे दर मिळत आहे. शेतकरी महादेव चेंडके यांच्या लिंबूला 100 रुपये किलो ते 120 रुपये किलो या दराने कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मिळत आहे. 8 ते 10 वर्षांपूर्वी लावलेल्या या बागेतून शेतकरी महादेव चेंडके यांनी आतापर्यंत 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. शेतकऱ्यांनी लिंबूची बाग लावून त्याचे व्यवस्थापन, खत, फवारणी वेळेवर केल्यास लिंबू बागेतून भरघोस उत्पन्न मिळवता येईल, असा मत शेतकरी महादेव चेंडके यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 22, 2025 9:55 PM IST