advertisement

Pomegranate Farming: महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं डाळिंब, सोलापूरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं!

Last Updated:

शेतकरी मोहन भोसले यांनी तीन एकरात सोलापूर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. सध्या डाळिंबाला बाजारात चांगलीच मागणी असल्यामुळे 5 ते 6 लाखांचे उत्पन्न शेतकरी मोहन भोसले यांना मिळणार आहे.

+
News18

News18

सोलापूर: बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी मोहन भोसले यांनी तीन एकरात सोलापूर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकरात डाळिंब लागवडीला खर्च 3 लाख रुपयांपर्यंत आला आहे. सध्या डाळिंबाला बाजारात चांगलीच मागणी असल्यामुळे 5 ते 6 लाखांचे उत्पन्न शेतकरी मोहन भोसले यांना मिळणार आहे.
पापरी गावातील शेतकरी मोहन दत्तात्रय भोसले यांनी तीन एकरात सोलापूर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकरात मोहन यांनी 12 सोलापूर भगवा या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. तीन एकरामध्ये सोलापूर भगवा डाळिंब लागवडीसाठी रोप, फवारणी, खत, आदी मिळून 3 लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.
advertisement
सोलापूर भगवा जातीच्या डाळिंबावर कुजवा आणि डाग हे दोन रोग पडतात. रोपांवर योग्य त्या औषधांची फवारणी करून या दोन्ही रोगांपासून बचाव केले जातेउन्हाळ्यात तीन एकरामध्ये डाळिंब खराब होऊ नये यासाठी मोहन भोसले यांनी डाळिंबाच्या बागेवर शेडनेट मारले होते. सोलापूर भगवा डाळिंब लागवडीतून अधिक माल निघतो. आकाराने जरी हा डाळिंब लहान असला तरी या सोलापूर भगवा डाळिंबाचे उत्पादन जास्त असतं. मोहन यांनी सोलापूर भगवा डाळिंबाची पहिल्यांदाच लागवड केली असून दहा टनपेक्षा अधिक डाळिंब उत्पादन मिळणार आहे. तर या डाळिंबाच्या विक्रीतून त्यांना 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावातील शेतकरी मोहन भोसले यांच्या डाळिंबाला खरेदी करण्यासाठी व्यापारी शेतात भेट देत आहेत. सरासरी 50 ते 60 रुपये किलो दराने या डाळिंबाला व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे. परंतु भोसले यांनी हा डाळिंब 80 ते 90 रुपये किलो दराने विक्री करायचा आहे. शिक्षण शिकूनही नोकरी जर मिळत नसेल तर तरुणांनी नक्कीच शेतीकडे वळावेनोकरीपेक्षाही जास्त उत्पन्न मिळेलअसा सल्ला शेतकरी मोहन भोसले यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Pomegranate Farming: महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं डाळिंब, सोलापूरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement