Flower Farming: पारंपरिक पिकाला फाटा, या गावातील शेतकऱ्यांनी निवडला फूलशेतीचा मार्ग, एकरी 4 लाखांचा नफा

Last Updated:

सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पारंपरिक पिके घेण्याबरोबरच शेतकरी वेगवेगळी नवीन पिके देखील घेत आहेत. जालना शहर आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी फूलशेतीच्या माध्यमातून चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत.

+
News18

News18

जालना: सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पारंपरिक पिके घेण्याबरोबरच शेतकरी वेगवेगळी नवीन पिके देखील घेत आहेत. जालना शहर आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी फूलशेतीच्या माध्यमातून चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत. शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पाचनवडगाव येथील अनेक शेतकरी फूलशेतीच्या माध्यमातून एकरी 3 ते 4 लाखांचा नफा कमवतात याच गावातील काही फूल उत्पादक शेतकऱ्यांशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला पाहुयात.
पाचनवडगाव येथील कैलास सुलताने 2006 पासून फूलशेतीच्या व्यवसायात आहेतगुलाबलिलीगुलछडीमोगरा यासारखी फुले ते आपल्या शेतात घेतातया फुलांना सण-उत्सवाच्या काळात अतिशय चांगला दर मिळतोसोयाबीनकापूस यासारख्या पारंपरिक पिकांच्या तुलनेत फूलशेती फायदेशीर ठरतेवर्षाकाठी एक ते सव्वा लाखांचा खर्च येत असला तरी 3 ते 4 लाखांचा निव्वळ उत्पन्न हातात येते.
advertisement
जालना शहर हाकेच्या अंतरावर असल्याने फुले विकून पुन्हा शेतातील कामे करण्यासाठी गावी येता येते. हेच पैसे शेतातील मुख्य पिकांना उपयोगी येतात आणि या माध्यमातून घरखर्च देखील चालवला जातो. जालना शहरात फूल विक्रीस घेऊन गेल्यानंतर दिवसाला दीड ते दोन हजारांपासून पाच हजार रुपयेयापर्यंत कमाई होते, असे शेतकरी कैलास सुलताने यांनी सांगितले.
advertisement
माझ्याकडे गुलाबगुलछडीलिली आणि मोगरा अशी फुले असतात. गुलाबाला साधारणपणे 60 रुपयांपासून 100 रुपये किलो असा दर मिळतोलिली दहा ते वीस रुपये गड्डे या पद्धतीने विक्री होते. गुलछडीला 200 ते 300 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. तर मोगऱ्याला 200 ते 500 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. आमच्या गावात जवळपास प्रत्येकाच्या घरी थोडीफार का होईनाफूलशेती आहे. माध्यमातून लोकांना घरखर्च चालवण्यासाठी आणि शेतीचा खर्च भागवण्यास मदत होते, असे कैलास सुलताने यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या/कृषी/
Flower Farming: पारंपरिक पिकाला फाटा, या गावातील शेतकऱ्यांनी निवडला फूलशेतीचा मार्ग, एकरी 4 लाखांचा नफा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement