पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळेपणा आला असेल तर नियंत्रण कसं मिळवायचं?

Last Updated:

Agriculture News : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची वाढ होण्यात अडथळा येत आहे. विशेषतः सोयाबीन पिकात पिवळेपणा (Chlorosis) हा मोठा समस्या ठरत आहे.

 Agriculture News
Agriculture News
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची वाढ होण्यात अडथळा येत आहे. विशेषतः सोयाबीन पिकात पिवळेपणा (Chlorosis) हा मोठा समस्या ठरत आहे. पावसामुळे मातीतील अति आर्द्रतेमुळे झाडांची मूळ प्रणाली कमकुवत होते, ज्यामुळे अन्नद्रव्य शोषणात अडथळा येतो आणि त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडतात. योग्य वेळी लक्ष न दिल्यास उत्पादनात मोठा घट येऊ शकतो.
पिवळेपणाची प्रमुख कारणं
अति पाऊस व पाणथळ जमिनीत पाणी साचणे तसेच सतत पाऊस झाल्यामुळे मातीतील हवा कमी होते,ज्यामुळे मूळांचा श्वासोच्छ्वास खोळंबतो आणि झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.
अन्नद्रव्यांची कमतरता
विशेषतः लोह (Iron), गंधक (Sulphur), झिंक (Zinc), मॅग्नेशियम (Magnesium) यांची कमतरता पावसामुळे झाडांना होऊ शकते.
जमिनीचा अपुरे निचरा
जर निचरा योग्य नसेल, तर मुळ्याभोवती पाणी साचते आणि त्यामुळे मुळे कुजतात.
advertisement
लक्षणं काय आहे?
झाडांची जुनी किंवा नवीन पाने फिकट पिवळसर दिसतात. काही वेळा फक्त शिरांमधील भाग हिरवा आणि इतर भाग पिवळा असतो (interveinal chlorosis). वाढ खुंटते. झाडांची उंची कमी राहते.काही झाडांची पाने गळून पडतात.
नियंत्रणासाठी उपाय योजना
1)शेतात निचऱ्याची व्यवस्था करा
शेतात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे.शेतात चर तयार करून अतिरिक्त पाणी बाहेर पडेल याची व्यवस्था करावी.
advertisement
2)मायक्रोन्युट्रिएंट्सची फवारणी
मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 (सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असलेला मिश्रण) 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लोहाच्या कमतरतेसाठी फेरस सल्फेट (FeSO₄) 0.5% द्रावण (50 ग्रॅम/10 लिटर पाणी) फवारावे. झिंकच्या कमतरतेसाठी झिंक सल्फेट 0.5% फवारणी उपयुक्त ठरते.
3)नत्र व फॉस्फरसचा समतोल वापर
पिकाला आवश्यकतेनुसार नत्र व फॉस्फरस खतांची मात्रा देण्यात यावी. मुळ्यांची वाढ वाढवण्यासाठी फुल्विक अॅसिड किंवा अमिनो अॅसिड युक्त बायोस्टिम्युलंटचा वापर फायदेशीर ठरतो.
advertisement
फवारणी करताना काय काळजी घ्यावी?
फवारणी करताना हवामान कोरडे असेल याची खात्री करावी. सतत पाऊस असल्यास फवारणी थोडी पुढे ढकळावी,अन्यथा औषध पाण्यातून वाहून जाते. झाडांची स्थिती सुधारली नाही तर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
दरम्यान, पावसाळ्यातील हवामान अनिश्चित असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर दैनंदिन निरीक्षण ठेवावे, वेळीच लक्षणं ओळखून उपाय केल्यास पिकाचं आरोग्य टिकवता येते आणि उत्पादनात घट येणार नाही.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळेपणा आला असेल तर नियंत्रण कसं मिळवायचं?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement