Soybean Price: शेतकऱ्यांना दिलासा, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, भविष्यात कशी राहील स्थिती?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मागील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जालना: मागील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन हंगामापासून ते जुलै महिन्यापर्यंत सोयाबीन दर हे 4000 ते 4200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. आता दर 4700 ते 4800 पर्यंत वाढले आहेत. पाहुयात काय आहेत सोयाबीन दरवाढीची कारणे.
सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. यामुळे भारतातील सोयाबीन दर सुधारले आहेत. त्याचबरोबर पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेंडेला चांगली मागणी आहे. बाजारात सोयाबीनचा पुरवठा देखील घटला आहे. आवक कमी झाल्याने मागणी वाढली आहे. परिणामी दरात तेजी पहायला मिळत आहे.
advertisement
तर दुसरीकडे केंद्र सरकारने सोयाबीन हमीभावात घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे देखील सोयाबीन दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर आगामी काळात सण-उत्सव मोठ्या प्रमाणात आहेत. उत्सव काळात सोयाबीन तेलाला मागणी वाढते. त्यामुळे दरावर परिणाम झाला असल्याचे व्यापारी संजय कानडे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
दरम्यान, सध्या शेतकऱ्यांकडील सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे. आणखी महिनाभरात सोयाबीन आवक सुरू होईल. परंतु, तेव्हाचे मागणी आणि पुरवठा गणित यावर सोयाबीन दराचे भवितव्य अवलंबून असल्याचे देखील जालना येथील आडत व्यापारी संजय कानडे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 13, 2025 7:46 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Price: शेतकऱ्यांना दिलासा, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, भविष्यात कशी राहील स्थिती?







