10 महिन्यात कमावला 14 लाखांचा नफा, शेतकऱ्याने शेतात असा कोणता प्रयोग केला?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
आष्टा येथील शेतीनिष्ठ सुनील माने यांनी अडीच एकर जी-9 केळीतून 70 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले. यातून त्यांना 10 महिन्यात 14 लाखांचा नफा झाला.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : सांगलीच्या आष्टा येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनील आनंदराव माने ऊस शेतीला पूर्णपणे फाटा देत फळ शेतीकडे वळले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते केळी पिकात प्रयोग करत आहेत. नुकतेच त्यांनी अडीच एकर जी-9 केळीत 14 लाखांचा नफा कमवला. शेतीनिष्ठ सुनील माने यांनी केळी पिकाच्या व्यवस्थापनात केलेल्या प्रयोगातून केळीची उत्पादनक्षमता आणि दर्जा वाढवला आहे.
advertisement
शेतीनिष्ठ सुनील माने यांनी 2014 पासून केळी पिकाची आवड जोपासली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये अडीच एकर क्षेत्रात त्यांनी जी-9 केळीची लागवड केली होती. रोप लागवडीनंतर 21 दिवसापर्यंत ठिबक द्वारे तीन आळवणी दिल्या. प्रत्येक महिन्याला एक भेसळ डोस याप्रमाणे तीन महिने तीन भेसळ डोस दिले. तीन महिन्यानंतर पिकाची बाळ भरणी करून शेत थोडेसे हलवून घेतात. त्यानंतर नियमित पाणी आणि ठिबक द्वारे रासायनिक खतांच्या मात्रा दर सोमवारी देतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एकरी सहा किलो मिश्र रासायनिक खतांचे डोस देतात.
advertisement
अडीच एकर क्षेत्रामध्ये 3200 रोपांची लागवड केली होती. यातून दहा महिन्यात 70 टन इतके भरघोस उत्पादन निघाले. 70 टन दर्जेदार केळीची निर्यात केली. यातून त्यांना दहा महिन्यात 14 लाखांचा नफा झाला.
प्रयोगातून वाढवले रोपातील अंतर
शेतीनिष्ठ सुनील माने यांनी 2014 साली पहिल्यांदा जी-9 केळीची लागवड केली होती. तेव्हा त्यांनी दोन रोपातील अंतर 8×4 ठेवले होते. त्यानंतर 6×4 रोपातील अंतराचा प्रयोग केला. गेल्या चार वर्षांपासून ते 7×5 वर केळीची लागवड करत आहेत. रोपातील अंतर सात बाय पाच वर ठेवल्यामुळे पॉवर टेलरने मशागत करता येते. शिवाय भांगलन आणि औषध फवारणीच्या खर्चामध्ये बचत होत असल्याचा अनुभव शेतीनिष्ठ सुनील माने यांनी सांगितला.
advertisement
अभ्यासपूर्ण प्रयोगातून केळीच्या दोन रोपातील अंतर वाढवून त्यांनी मशागतीसह खतांच्या व्यवस्थापनामध्ये आधुनिकता आणली. दहा वर्षाच्या अनुभवासह निर्यात क्षम केळीमध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे. स्वतःच्या शेतामध्ये निर्यादक्षम केळी उत्पादित करत ते अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
January 25, 2025 7:53 PM IST