रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांच्या लॅपटॉपमध्ये..,रुपाली चाकणकरांचा मोठा दावा, पुणे पोलिसांना थेट सूचना

Last Updated:

रेव्ह पार्टीच्या संदर्भात मोबाईल असतील लॅपटॉप असतील यात हे अश्लील व्हिडिओ आढळून आलेत. यात तक्रारदार महिला पुढे येऊन त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत

रवी सपाटे, प्रतिनिधी
भंडारा: पुण्यातील कथीत रेव्ह पार्टी प्रकरणी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले होते.  खेवलकरांच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ आढळले होते, या प्रकरणात राज्य महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना कारवाई करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी यांनी दिली.
advertisement
राज्य महिला आयोग गेल्या चार वर्षापासून ह्युमन प्रॉब्लेमवर सातत्यानं मोठ्या प्रमाणावर काम करतेय. खेवलकरांचं रेव्ह पार्टीचं जे प्रकरण होतं, अडीचशे 300 पेक्षा जास्त महिलांना विविध प्रलोपण देऊन फसवलं. त्यांचे अत्यंत अश्लील पद्धतीचे व्हिडिओ शूट केलेले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना कारवाई करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
advertisement
तसंच, रेव्ह पार्टीच्या संदर्भात मोबाईल असतील लॅपटॉप असतील यात हे अश्लील व्हिडिओ आढळून आलेत. यात तक्रारदार महिला पुढे येऊन त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास खोलवर व्हावा यासाठी एसआयटी गठीत करावं, असं पत्र पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलंय. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. मुलींना, महिलांना आमिष देऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ काढणे. रेव्ह पार्टीमध्ये आलेल्या मुली, महिला संदर्भात ह्युमन ट्रॉफीकिंग मधल्या असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. अजून कुठल्या महिलांची मुलींची फसवणूक होऊ नये, अशा प्रकारचे आमिष दाखवून फसवणूक आणि लैंगिक अत्याचार होत असेल तर, त्याचा सखोल तपास झाला पाहिजे. यासाठी महिला आयोगाच्या वतीने यात एसआटी गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही
advertisement
रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.
'विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजना ज्यावेळेस जाहीर केली तेव्हापासूनच विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय. म्हणून ही योजना फसवी आहे, निवडणुकीचा जुमला आहे, ही योजना यशस्वी होणार नाही. असे जे विरोधक बोलतात आहे, याच विरोधकांनी स्वतःच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी आम्हाला मतदान करावं, ३ हजार रुपये दर महिन्याला महिला भगिनींना देणार. जर विरोधक म्हणतात आर्थिक तरतूद होऊ शकत नाही. तर, विरोधक कोणत्या मुद्द्यावर 3000 रुपये देणार होते. त्यामुळे विरोधकांचा हा काळा डाव होता. म्हणून महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा काळा डाव हा ओळखला होता म्हणून त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळाली नाही, अशी टीकाही चाकणकर यांनी विरोधकांवर केली.
advertisement
'लाडक्या बहिण योजनेमुळं इतर खात्यावर अजिबात भार नाही'
'महाराष्ट्रातील महिला भगिनींनी त्यांना नाकारलय आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं इतर खात्यावर भार अजिबात पडत नाही. खऱ्या अर्थानं यात अजिबात तथ्य नाही. विरोधक पहिल्या दिवसापासून आजतागायत त्यांना झोपेत सुद्धा स्वप्न पडतंय की लाडकी बहीण योजना बंद होणार, असं हे विरोधक बोलतात आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे मुद्दे राहिलेले नाही त्यांच्या मानसिकतेची कीव वाटतेय, असा टोलाही चाकणकर यांनी लगावला.
advertisement
'हुंडा मागणे म्हणजे विकृती, कुणी हुंडा मागितल्यास गोंदियात मुलगी देत नाही'
गेल्या चार वर्षात बालविवाह, विधवा प्रथा, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या यावर राज्य महिला आयोगानं युद्ध पातळीवर काम केलेलं आहे. गोंदियाकरांचं खूप कौतुक करावसं वाटतंय. आढावा घेत असताना तिथं प्रकर्षानं जाणवलं कुणी हुंडा मागत असेल तर गोंदियात कुणी मुलगीचं देत नाही. हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा असताना सुद्धा आपण हुंडा का देतोय? हुंडा मागणारे लोकं म्हणजे विकृती आहे. त्यांना मुलगी नकोय हुंडा हवाय. त्यामुळे आता आपण स्वतःहून पुढे येऊन कोणी हुंडा मागत असेल तर स्वतःहून पोलिसात तक्रार करा. हुंडा मागतात तेव्हा हुंड्या दिल्या जातो आणि नंतर त्यांची मागणी कुठंही थांबत नाही, त्यांची भूक भागत नाही. कायदा आहे ना?? हुंडा आपण देऊ नये. गोंदियात हुंडा मागितला तर मुलगी देत नाही. म्हणून त्यांची ही चांगली मानसिकता आहे. म्हणून तिथं हुंडाबळी नाही, म्हणून गोंदियाकरांचं मनापासून कौतुक करेल. गोंदियाकरांच्या या चांगल्या मानसिकतेचा विचार करून त्याचं अनुकरण केल्यास कायदा सुव्यवस्था आणि त्यांचं काम करते. मात्र, एक सुजाण नागरिक म्हणून अशा विकृतीच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल,असंही चाकणकर म्हणाल्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांच्या लॅपटॉपमध्ये..,रुपाली चाकणकरांचा मोठा दावा, पुणे पोलिसांना थेट सूचना
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement