रुबाबदार कोल्हापूरचा गब्बर! किंमत तब्बल 58 लाख रुपये, खाण्यावर रोज दीड हजार खर्च,Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
कोल्हापुरातील अमोल भास्कर यांचा हा घोडा जवाहरनगर परिसरामध्ये असतो. अमोल भास्कर यांनी हा घोडा लहान असताना तब्बल 18 लाख रुपये किंमतला घेतला होता.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरचा गब्बर.. त्याला दिवसातून साधारण दहा लिटर दूध लागतं.. खुराक म्हणून हरभरा, उकडलेले शाबू, हूलगा उडीद डाळ, भुसा आणि कडबा कुटी असा त्याच्या खाण्यावर रोज दीड हजार रुपये खर्च केले जातात. इतकंच नव्हे तर याच्या तपासणीसाठी पुण्यातून डॉक्टरांना बोलावलं जातं. हे रुबाबदार वर्णन आहे कोल्हापूरमध्ये एकमेव असणाऱ्या गब्बर नावाच्या घोड्याच.. कोल्हापुरात सतेज कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये या घोड्याचा देखील समावेश होता. कोल्हापुरातील अमोल भास्कर यांचा हा घोडा जवाहरनगर परिसरामध्ये असतो. अमोल भास्कर यांनी हा घोडा लहान असताना तब्बल 18 लाख रुपये किंमतला घेतला होता. त्यांनी हा घोडा आवड म्हणून पुष्कर मेळाव्यातून खरेदी केला होता. या घोड्याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिलीय.
advertisement
हा घोडा मारवाडी जातीचा असून तो साधारण 18 लाख रुपयांना खरेदी केला होता. भास्कर यांना घोडेपालनाची आवड आहे. त्यामुळे हा घोडा त्यांनी खरेदी केला होता. हा घोडा कोल्हापूर शहरात एकमेव आहे. आणि जिल्ह्यात अगदी बोटावर मोजण्या इतकीच या घोड्यां च्या प्रजातीची संख्या आहे. सध्या या घोड्याचं वय चार वर्षे आहे. याच्या वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातून पथके येत असतात. साधारण याच्या खाण्यासाठी महिन्याला तब्बल 40 हजार रुपयांचा खर्च केला जातो, असं घोडामालक भास्कर यांनी सांगितलं.
advertisement
या गब्बरचा खुराकही तसा विशेष आहे. या घोड्याला रोज दहा लिटर आखरी दूध, हरभरे, उकडलेला शाबू आणि कडबा कुटी दिली जाते. साधारण या खाण्यालाच महिन्याचे 35 ते 40 हजार रुपये त्यांना मोजायला लागतात. त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी हा घोडा विकण्यासाठी तब्बल 58 लाखांची ऑफर आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. या बद्दल अश्व अभ्यासक सुनील चौगुले यांनी लोकल 18 शी बोलताना माहिती दिलीय.
advertisement
मागणी 58 लाखांची पण..
घोडामालक अमोल भास्कर यांना या घोड्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातून 58 लाख रुपयांची ऑफर आली होती. मात्र तरीही भास्कर यांनी ही ऑफर नाकारली. हा घोडा भास्कर यांचा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्यांनी पैशांना महत्त्व दिलं नाही. या घोड्यासाठी तब्बल 40 हजारांच्या घरात खर्च केला जातो. मात्र तरीही हा घोडा त्यांना प्रिय आहे.
advertisement
प्रदर्शनात गब्बरचीच चर्चा
या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जनावरे आणि घोड्यांचं समावेश होता. मात्र कोल्हापूरच्या गब्बर नावाच्या घोड्याची एक वेगळीच चर्चा होती. रुबाबदार देखणं रूप असल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेंगलोर कर्नाटक या ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांनी गब्बरला पाहायला गर्दी केली होती.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 31, 2024 9:19 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
रुबाबदार कोल्हापूरचा गब्बर! किंमत तब्बल 58 लाख रुपये, खाण्यावर रोज दीड हजार खर्च,Video