स्वप्नात हत्ती दिसण्याचा काय अर्थ असतो? शुभ की अशुभ, काय सांगतं स्वप्नशास्त्र?

Last Updated:

काहीवेळा आपल्याला प्राण्यांची स्वप्न पडतात. हत्ती हा मूळातच शुभ प्राणी मानला जातो. त्याला साक्षात गणपती बाप्पाचं रूप मानतात. आज आपण हत्ती स्वप्नात येण्यामागे नेमका काय अर्थ असतो जाणून घेणार आहोत.

गरोदरपणात हत्ती स्वप्नात दिसला तर...?
गरोदरपणात हत्ती स्वप्नात दिसला तर...?
अभय पांड्ये, प्रतिनिधी
नवी दिल्ली : झोपेत स्वप्न पडणं अत्यंत सामान्य आहे. काही स्वप्न सुखद असतात, तर काही स्वप्न धडकी भरवतात. स्वप्नशास्त्र सांगतं की, सर्व नाही पण काही स्वप्न आपल्याला विशेष संकेत देतात. मग ते चांगलेही असू शकतात किंवा वाईटही. 
काहीवेळा आपल्याला प्राण्यांची स्वप्न पडतात. हत्ती हा मूळातच शुभ प्राणी मानला जातो. त्याला साक्षात गणपती बाप्पाचं रूप मानतात. आज आपण हत्ती स्वप्नात येण्यामागे नेमका काय अर्थ असतो जाणून घेणार आहोत. स्वप्नात हत्ती दिसणं हा अत्यंत शुभ संकेत असतो, असं म्हणतात. याचा अर्थ असा होतो की, लवकरच आयुष्यात भरपूर आनंद येणार आहे. तसंच स्वप्नात हत्ती विविध रूपात दिसण्याचा नेमका काय अर्थ होतो, जाणून घेऊया.
advertisement
हत्तीची सवारी दिसणं : हे करियरबाबत सकारात्मकता दर्शविणारं स्वप्न असतं. याचा अर्थ असा होतो की, लवकरच आपलं प्रमोशन होणार आहे, कामकाज विस्तारणार आहे. अर्थात हे स्वप्न प्रगतीचा संकेत देतं.
हत्तीचं जोडपं दिसणं : हत्ती आणि हत्तीण एकत्र दिसणं हादेखील अतिशय शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा होतो की, वैवाहिक जीवनात भरपूर आनंद येणार आहे. सुदृढ नातेसंबंध दर्शविणारं हे स्वप्न असतं. 
advertisement
गरोदरपणात हत्तीचं स्वप्न पडणं : एखाद्या महिलेला गरोदरपणात हत्तीचं स्वप्न पडणं हा शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा होतो की, होणारं बाळ अतिशय भाग्यवान असणार आहे.
झुलणारा हत्ती : स्वप्नात जर आपल्याला हत्ती छान झुलताना दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, आपण सहन करत असलेल्या अडचणींवर लवकरच उत्तम मार्ग निघणार आहे. 
advertisement
हत्तींचा कळप दिसणं : स्वप्नात अनेक हत्ती एकत्र दिसणं हादेखील भरभराटीचा संकेत असतो. याचा अर्थ लवकरच आपल्याला आर्थिक फायदा होणार आहे असा होतो. 
उभा हत्ती : आपण आपल्या ध्येयाप्रती करत असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होणार असल्याचा हा संकेत असतो. शिवाय आपल्या कठीण काळात आपण एकटे पडणार आहोत याचाही हा संकेत असू शकतो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वप्नात हत्ती दिसण्याचा काय अर्थ असतो? शुभ की अशुभ, काय सांगतं स्वप्नशास्त्र?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement