ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या साखर कारखान्याकडून ऊसाचे पैसे खात्यात जमा

Last Updated:

Agriculture News : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2024-25 हंगामातील गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन 2,723 रुपये या दराने एकूण सुमारे 70 कोटी रुपये पेमेंट अदा केले आहे.

News18
News18
अहिल्यानगर: वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2024-25 हंगामातील गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन 2,723 रुपये या दराने एकूण सुमारे 70 कोटी रुपये पेमेंट अदा केले आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली आहे.
कारखान्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने पुढील हंगामाची तयारी सुरू असून, 2025-26 गळीत हंगामासाठी 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढविण्यासाठी, शेतकी विभागामार्फत ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात येत आहेत. तसेच, उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने विचार सुरू आहे. हे आधुनिक पाऊल ऊस उत्पादकतेमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
advertisement
मशिनरी दुरुस्ती व देखभाल यासारखी तयारी देखील वेळेत सुरू करण्यात आली असून, आगामी हंगाम वेळेवर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती संचालक राहुल राजळे यांनी दिली.
दरम्यान, 2025-26 च्या गळीत हंगामासाठी, कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आपला संपूर्ण ऊस वृद्धेश्वर कारखान्याकडे नोंदवावा आणि त्याचा गाळपासाठी पुरवठा करावा, असे आवाहन उपाध्यक्ष रामकिसन काकडे आणि संचालक मंडळाने केले आहे.
advertisement
वृद्धेश्वर कारखाना पारदर्शक व्यवहार, शेतकऱ्यांशी बांधिलकी आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार या त्रिसूत्रीवर आपली वाटचाल करत असून, या वाटचालीत शेतकऱ्यांच्या सहकार्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे कारखान्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या साखर कारखान्याकडून ऊसाचे पैसे खात्यात जमा
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement