माडग्याळी मेंढींच्या किंमती लाखात का असतात? खास आहे यामागचं कारण..
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सांगलीच्या जत पूर्व भागातील लोकांचा मेंढी पालनावर विशेष भर दिसतो आहे. कारण या माळरानावर वाढणाऱ्या खुरट्या गवतांवर याच माडग्याळी मेंढ्या तग धरून आहेत.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : उष्ण तापमान, अवर्षणप्रवण आणि जिकडे पाहावे तिकडे पसरलेले माळरान अशी अवस्था असलेल्या सांगलीच्या जत पूर्व भागातील लोकांचा मेंढी पालनावर विशेष भर दिसतो आहे. कारण या माळरानावर वाढणाऱ्या खुरट्या गवतांवर याच माडग्याळी मेंढ्या तग धरून आहेत. माडग्याळ परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरणाऱ्या माडग्याळी मेंढींच्या काय असतात किंमती आणि वैशिष्ट्ये पाहुयात.
advertisement
लोकल 18 च्या प्रतिनिधींनी जत पूर्व भागातील मेंढपाळांची संवाद साधला. तेव्हा कोळगिरी गावातील लक्ष्मण डिस्कळ यांनी माहिती दिली. डिस्कळ हे गेल्या पंधरा वर्षापासून माडग्याळी मेंढ्यांचे पालन करत आहेत. मागील काही दिवसात त्यांनी माडग्याळी प्रजातीतील एक बकरा 5 लाखाला विकला आहे. कर्नाटक सीमा भागासह सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मेंढ्या स्थलांतरित करून संगोपन करतात. मेंढ्यांमध्ये नर आणि मादीला लाखात पैसे मिळतात. मेंढ्यांच्या विक्रीतूनच उदरनिर्वाह करत असल्याचे लक्ष्मण डिस्कळ यांनी सांगितले.
advertisement
माडग्याळ गावचे रहिवाशी मारुती बंडगर हे परंपरागत मेंढी पालनाचा व्यवसाय करत आहेत. यांच्याकडे माडग्याळी प्रजातीच्या चाळीस मेंढ्या आहेत. यांनी पिढ्यानपिढ्या संवर्धन करून निवड पद्धतीने माडग्याळी प्रजातीचे जतन केले आहे.
मेंढपाळ मारुती बंडगर यांनी माडग्याळी मेंढीची सांगितलेली वैशिष्ट्ये अशी
रोमन नोझ म्हणजेच म्हणजेच फुगीर नाक हे माडगळी मेंढीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
advertisement
लांब कान, दोन्ही डोळ्यांभोवती चॉकलेटी रंगाचे ठिपके असतात.
पांढरा रंग आणि त्यावर चॉकलेटी ठिपके.
उंच, लांब आणि काटक शरिर.
लांब पाय, लांब मान.
अठरा महिन्यातून दोनदा प्रजोत्पादन.
पन्नास किलोपर्यंत वजन.
पैदाशीसाठी उत्तम प्रजात असल्याने मोठी मागणी, अधिक किंमत मिळते.
इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या या माडग्याळी मेंढ्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. याचसह बरेच मेंढपाळ माडग्याळी जातीच्या नराचा वापर पैदाशीसाठी करतात. या मेंढ्यांच्या अंगावर अत्यंत कमी लोकर असून त्यांची लोकर वर्षातून एकदाच काढत असल्याचे मेंढपाळांनी सांगितले.
advertisement
या मेंढ्या कमी दूध देतात. परंतु त्यांच्या शरीराची वाढ अत्यंत जोमाने होते. दिसायला देखण्या असणाऱ्या माडग्याळी प्रजातीच्या नर आणि मादीला शिंगे नसतात. अतिशय काटक असणाऱ्या माडग्याळी मेंढी प्रजातीला मांस उत्पादनासाठी देशभरासह विदेशातही मागणी असल्याचे मेंढपाळ यांनी सांगितले. कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या जतच्या माडग्याळ परिसरातील रहिवाशांना याच मेंढी पालनामुळे मोठा आधार मिळाला आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 12, 2024 5:21 PM IST