दोन दिवस बाकी! 1 जानेवारीपासून सरकारी लाभ मिळणार नाही, शेतकऱ्यांनी हे 4 कामं करून घ्याच

Last Updated:

Agriculture News :  वर्षाचा शेवट जवळ आला असून डिसेंबर महिना संपण्यासाठी फक्त 24 तास शिल्लक राहिले आहेत.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : वर्षाचा शेवट जवळ आला असून डिसेंबर महिना संपण्यासाठी फक्त 24 तास शिल्लक राहिले आहेत. शेतीशी संबंधित तसेच वैयक्तिक कागदपत्रांशी निगडित काही आवश्यक कामे 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण न केल्यास नव्या वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान, दंड किंवा शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. शासनाने काही महत्त्वाच्या योजनांसाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली असून या तारखेआधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
कोणती कामे करावी लागणार?
आधार पॅनकार्ड लिंक करणे
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे. अनेक शेतकरी बँक व्यवहार, पीक विमा, अनुदान, कर्ज आणि विविध सरकारी योजनांसाठी पॅन कार्डचा वापर करतात. जर एखाद्या शेतकऱ्याने 1 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी आधार कार्ड काढले असेल आणि ते पॅनशी लिंक केले नसेल, तर 31 डिसेंबरनंतर पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. पॅन निष्क्रिय झाल्यास बँक खात्याशी संबंधित व्यवहार, शेतमाल विक्रीचे पैसे, अनुदानाची रक्कम आणि आयकराशी संबंधित कामे अडचणीत येऊ शकतात. ही प्रक्रिया आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाईन करता येते. मात्र उशीर केल्यास दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
advertisement
रेशन कार्ड केवायसी
रेशन कार्ड केवायसी हा देखील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अनेक शेतकरी कुटुंबे सरकारकडून मिळणाऱ्या मोफत किंवा स्वस्त धान्यावर अवलंबून असतात. रेशन कार्ड केवायसी पूर्ण न केल्यास भविष्यात मोफत रेशन बंद होण्याची शक्यता आहे. जरी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असली तरी, अनेक ठिकाणी प्रशासनाकडून आताच केवायसी करण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आधारशी लिंक असलेली केवायसी वेळेत करून ठेवणे फायद्याचे ठरणार आहे.
advertisement
पीक विमा भरणे
शेतकऱ्यांसाठी सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा उतरवण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दंव किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी पीक विमा हीच शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधाराची कडी ठरते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी बँक, सीएससी केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीने विमा प्रस्ताव वेळेत भरावा, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
प्रधानमंत्री आवास योजना
याशिवाय, ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना मोठा आधार आहे. या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील 31 डिसेंबर असून, इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दोन दिवस बाकी! 1 जानेवारीपासून सरकारी लाभ मिळणार नाही, शेतकऱ्यांनी हे 4 कामं करून घ्याच
Next Article
advertisement
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement