हरभऱ्याची कधी करावी पेरणी? जमीन कशी असावी? शेतकऱ्यांच्या कामाची बातमी
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी करत असताना कोणकोणत्या बाबींची काळजी घ्यावी? याबद्दल कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनुने यांनी माहिती दिली आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मक्का, गहू अशी प्रमुख पिके आहेत. यापैकी हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असतात. मात्र पेरणी करत असताना ज्या महत्त्वाच्या बाबी असतात. त्या लक्षात न घेता हरभरा पिकाची पेरणी केल्यास भविष्यात मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं. म्हणूनच शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी करत असताना कोणकोणत्या बाबींची काळजी घ्यावी? याबद्दल कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनुने यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कधी करावी पेरणी?
हरभरा पिकाची पेरणी करत असताना पेरणीची तारीख अतिशय महत्त्वाची असते. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ही 20 ऑक्टोबर पर्यंत करावी तर बागायती हरभरा पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. जास्तीत जास्त 30 नोव्हेंबर पर्यंत आपण हरभऱ्याची पेरणी करू शकतो.
advertisement
जमीन कशी असावी?
हरभरा पिकासाठी जमिनीची निवड करताना आपल्या शेतातील जमीन ही मध्यम ते भारी असायला पाहिजे साधारणतः 45 ते 60 सेंटिमीटर खोली असलेली जमीन ही हरभरा पिकासाठी उत्तम असते. जमिनीचा सामू हा सामान्य असला पाहिजे.
बियाण्याची प्रमाण किती असावे?
हरभऱ्याची पेरणी करताना बियाण्याची प्रमाण सर्वात महत्त्वाचे आहे. लहान आकाराचा दाणा असेल तर एकरी 20 ते 22 किलो हरभरे पेरावे. मध्यम आकाराचे हरभरा बियाणे असेल तर एकरी 30 किलोपर्यंत बियाणे पेरावे. तर काबुली किंवा डॉलर हरभरा असेल तर एकरी 40 किलो पर्यंत बियाणे पेरावे.
advertisement
पेरणी करताना काय काळजी घ्यावी?
पेरणी करताना दोन ओळीतील अंतर हे 30 सेंटिमीटर तर दोन झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर राहील याची काळजी घ्यावी. पेरणी आपण ट्रॅक्टरने देखील करू शकतो. साधारणतः पाच सेंटीमीटर खोलीवर बियाणे पडेल अशा पद्धतीने पेरणी करावी.
बीज प्रक्रियेचे महत्त्व
हरभरा पेरणीनंतर मोठा पाऊस झाल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया आवश्यक करावी. बीज प्रक्रिया साठी थायरॉईम दोन ग्रॅम कार्बनबेंझीम दोन ग्रॅम प्रति किलो वापरू शकता किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला वापरू शकता.
advertisement
खत व्यवस्थापन खरीप हंगामात कोणती पीक घेतले आणि जमिनीचे माती परीक्षण केल्यानंतर काय परिस्थिती आहे. यावर खताची मात्रा अवलंबून असते. परंतु हरभरा पिकासाठी हरभरा पिकासाठी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रती हेक्टरी आपण दिले पाहिजेत. त्याचबरोबर एकरी दहा किलो गंधक वापरल्यास त्याचाही चांगला फायदा हरभरा पिकाच्या वाढीसाठी आणि दाणे भरण्यासाठी होतो, असं श्रीकृष्ण सोनुने यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Oct 18, 2024 7:12 PM IST









