काही ठिकाणी हवामानातील बदलामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाल्याने दरात किंचित घट दिसली, पण एकूणच राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनचा कल तेजीकडेच आहे. विशेषतः पिवळ्या जातीच्या सोयाबीनला मोठी मागणी दिसून आली, तर स्थानिक आणि हायब्रीड जातींचे भाव तुलनेने स्थिर राहिले.
वाशिममध्ये सर्वाधिक दर
मंगळवारी सर्वाधिक दर वाशिम बाजार समितीत ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला. सरासरी दर ६ हजार ५०० रुपयांवर स्थिर राहिला. वाशिममध्ये आलेल्या उच्च प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी मिळाल्याने दर वाढले.
advertisement
जालन्यातही चांगला प्रतिसाद
जालना बाजारात पिवळ्या सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळत ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजारात स्थिरता होती, मात्र आता थोडी तेजी परत आली आहे.
दर्यापूर व मेहकर बाजार तेजीत
दर्यापूर बाजारात भाव ७ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. मेहकर बाजारात सोयाबीनला ५ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळाला, तर इतर ठिकाणी सरासरी दर ४ हजारांच्या आसपास राहिले.
इतर बाजार समित्यांतील स्थिती
राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये म्हणजे लातूर, नागपूर, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बीड आणि बुलढाणा येथे सरासरी दर ४ हजार ३०० ते ४ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल इतका होता. काही ठिकाणी हवामानातील बदल आणि आर्द्रतेमुळे सोयाबीनचा दर्जा घसरल्याने भावात किरकोळ फरक पडला.
