TRENDING:

कृषी हवामान : शेतकऱ्यांवर आज पुन्हा आस्मानी संकट, 21 जिल्ह्यांना अलर्ट, काय काळजी घ्याल?

Last Updated:

Maharashtra Weather Update :  राज्यात सध्या हवामानाची अनिश्चितता कायम असून, काही भागांत मुसळधार पावसाचा तडाखा तर काही ठिकाणी कमाल तापमानाची चढ-उतार सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
maharashtra weather update
maharashtra weather update
advertisement

मुंबई : राज्यात सध्या हवामानाची अनिश्चितता कायम असून, काही भागांत मुसळधार पावसाचा तडाखा तर काही ठिकाणी कमाल तापमानाची चढ-उतार सुरू आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागांना सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

advertisement

कमी दाबाचा पट्टा आणि पावसाची परिस्थिती

उत्तर अंदमान समुद्रात म्यानमार किनाऱ्यालगत 22 सप्टेंबरपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच प्रभावामुळे 25 सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात पावसाची परिस्थिती बदलत राहील.

advertisement

पावसाची नोंद आणि तापमानातील तफावत

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे राज्यातील उच्चांकी 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र पावसाच्या हजेरीनंतरही काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

advertisement

कोणता अलर्ट? 

आज विजांसह पावसाचा इशारा नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू

advertisement

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 14 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून माघारी निघाले आहेत. सध्या भटिंडा, अजमेर, भूजपर्यंत परतीची सीमा स्थिर आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, दोन दिवसांत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागांतून मॉन्सूनची माघार होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

सध्या राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस, मका आणि भात पिके वाढीच्या टप्प्यात आहेत. सततचा पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे रोगराई व कीड वाढण्याचा धोका आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे :

सोयाबीन व तूर

अळी नियंत्रणासाठी : एमामेक्टिन बेंझोएट 5% SG (4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) फवारणी करावी. पर्णकोष अळी किंवा फुलकिडी दिसल्यास लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन 5% EC (5 मिली प्रति 10 लिटर पाणी) वापरावा.

कापूस

बोंडअळी नियंत्रणासाठी : क्विनालफॉस 25% EC (20 मिली प्रति 10 लिटर पाणी) फवारणी उपयुक्त.

पानगळबुरशीजन्य रोगांपासून बचावासाठी : मॅन्कोझेब 75% WP (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) वापरावा.

भात

तांदुळ्या रोग नियंत्रणासाठी : कार्बेन्डाझिम 50% WP (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) फवारावे.

पानांवर डाग पडल्यास : ट्रायसायक्लाझोल 75% WP (6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) फवारणी करावी.

मका

तणा किंवा डोक्यावरील अळी नियंत्रणासाठी : स्पिनोसॅड 45% SC (3 मिली प्रति 10 लिटर पाणी) फवारणी करावी.

मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांवर आज पुन्हा आस्मानी संकट, 21 जिल्ह्यांना अलर्ट, काय काळजी घ्याल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल