या वेळेस नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय निवडणं फार महत्त्वाचं ठरतं. अशा वेळी शेंगदाणे आणि मखाना हे दोन्ही लोकप्रिय आणि पौष्टिक पर्याय समोर येतात. मात्र दोघांमध्ये वजन कमी करण्यासाठी अधिक उपयुक्त कोणता? याबदल आहार तज्ज्ञ स्नेहा परांजपे यांनी माहिती दिली आहे.
स्नेहा परांजपे सांगतात की, शेंगदाणे प्रथिने, फायबर्स, आणि अत्यावश्यक जीवनसत्त्वांनी भरपूर असतात. शेंगदाण्यांमध्ये तंतू (fiber) जास्त असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारतात आणि दीर्घकाळ तुम्हाला ताजेतवाने ठेवतात. पण शेंगदाण्यांमध्ये कॅलरीजही जास्त असतात त्यामुळे त्यांचं प्रमाण योग्य ठरवणं आवश्यक आहे. 5-6 शेंगदाण्यांचे सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्याचं उच्च कॅलरी प्रमाण अधिक प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकतं.
advertisement
Health Tips: पाठदुखीची चिंता सोडा, हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम
तसेच मखाना कमी कॅलरी असलेला आणि अत्यंत पौष्टिक पर्याय आहे. त्यात कमी फॅट्स, उच्च प्रथिने आणि फायबर्स असतात. मखानांच्या सेवनाने आपली भूक नियंत्रणात राहते तसेच ते पचन प्रक्रियेवरही सकारात्मक परिणाम करतात. मखानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स जास्त असतात जे शरीराच्या विविध कार्यांना मदत करतात. मखाना हलका असून त्यात कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.
तर आहार तज्ज्ञ स्नेहा परांजपे यांच्या सल्ल्यानुसार वजन कमी करण्यासाठी मखाना हा सर्वोत्तम पर्याय ठरतो कारण त्यात कमी कॅलरी आणि उच्च पोषणतत्त्वांचा समावेश आहे. परंतु शेंगदाणे देखील कमी प्रमाणात खास करून भूक नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आपला आहार संतुलित ठेवणे महत्त्वाचं आहे.