पिवळ्या सोयाबीनचा बाजारात दबदबा
या दिवशी पिवळ्या वाणाच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला किमान ३,९११, तर सरासरी ४,५५० प्रति क्विंटल दर मिळाला.
लातूर-मुरुड बाजारात दर ४,३०० जालना येथे ४,१००, अकोला येथे ४,३५०, बीड येथे ४,३६१, किनवट येथे ४,०५०, तर सोनपेठ येथे ४,१०० प्रति क्विंटल इतका सरासरी दर नोंदवला गेला. काही ठिकाणी शेतकऱ्यांना मागील आठवड्यापेक्षा किंचित वाढीव भाव मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
advertisement
लोकल सोयाबीनचा दर स्थिर
लोकल वाणाच्या सोयाबीनची आवक दुसऱ्या क्रमांकावर होती. अमरावती बाजारात लोकल सोयाबीनला किमान ३,७५०, तर सरासरी ४,००७ प्रति क्विंटल दर मिळाला. सोलापूर येथे ४,२५०, जळगाव येथे ४,२०५, अमळनेर येथे ४,२८५, आणि मेहकर येथे ४,३५० प्रति क्विंटल इतका सरासरी दर मिळाला.
शेतकऱ्यांच्या मते, बाजारात आवक वाढल्याने दर थोडे स्थिर आहेत, पण पिवळ्या वाणाच्या सोयाबीनला खरेदीदारांकडून अधिक मागणी आहे.
डॅमेज, पांढरी आणि नं.१ सोयाबीनचे भाव
डॅमेज आणि पांढऱ्या वाणाच्या सोयाबीनला देखील काही ठिकाणी समाधानकारक दर मिळाले. डॅमेज सोयाबीनला तुळजापूर येथे सरासरी ४,४०० दर मिळाला. नं.१ सोयाबीनला ताडकळस बाजारात ४,२००, पांढऱ्या सोयाबीनला जळकोट येथे ४,४२१ प्रति क्विंटल दर नोंदवला गेला. याशिवाय माजलगाव येथे ४,२५१, रिसोड येथे ४,०५०, मोर्शी येथे ४,०६३, तर पुसद येथे ४,३०० प्रति क्विंटल दराने व्यवहार झाले.
शेतकरी आणि बाजाराचा कल
राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये सोयाबीन दर सध्या ३,९०० ते ४,५०० प्रति क्विंटल दरम्यान आहेत. काही ठिकाणी दर हमीभावापेक्षा किंचित जास्त असल्याचे दिसते. शेतकऱ्यांनी मात्र मागणीच्या चढउतारांचा अभ्यास करून विक्रीचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
हवामानातील अनिश्चिततेमुळे आणि हमीभावाच्या खरेदी प्रक्रियेमुळे बाजारातील दरांत बदल होत असले तरी, सोयाबीन उत्पादनाच्या गुणवत्तेनुसार खरेदीदारांकडून मागणी टिकून आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत बाजारात आणखी आवक वाढण्याची शक्यता असून, दर ५,००० पर्यंत पोहोचू शकतात,जर पावसाचा अडथळा आला नाही तर. राज्यातील लातूर, जालना, बीड आणि अमरावती या प्रमुख बाजारांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
