अरुण शिंदे यांनी प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये दोन ते तीन आजोळ्याचे बेड बनवले आहेत. एका बेडमधून दररोज दोन ते तीन किलो खाद्य कोंबड्यांसाठी मिळतो. आजोळा हे ग्रीन फीड आहे. ते पाण्यावर तरंगत असतो. या आजोळ्यापासून कोंबड्यांना प्रोटीन चांगल्या पद्धतीने मिळतो.
advertisement
एकदाच दीडशे झाडांची लागवड, शेतकऱ्यानं मिळवला 15 लाख नफा, असं काय केलं?
आजोळा तयार करण्यासाठी सुरुवातीला बेड तयार करावा लागतो. त्यामध्ये खाली एक इंच माती टाकावी लागते. तीन पाट्या शेणाची मिक्स रबडी तयार करावी टाकली जाते. त्यानंतर 100 सुपर फॉस्फेट टाकून त्यावरती सात इंच पाणी सोडून आजोळ्याचा कल्चर पाण्यात सोडून हा आजोळा तयार केला जातो. आजोळ्याचा बेड तयार करताना 50 टक्के शेडनेट असले पाहिजे.
कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्याचा खर्च जेवढा कमी असेल तेवढा उत्पन्न या व्यवसायातून जास्त मिळते. तर या कुक्कुटपालनातून अरुण शिंदे वर्षाला 10 ते 12 लाखांची उलाढाल करत आहेत.