उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात राहणारे सिद्धाराम भोसले यांच्याकडे एकच बैल आहे. तो बैल वृद्ध झाल्याने त्याला शेतकामाला जुंपत नव्हते. पण त्यांच्या आरोग्याची काळजी नेहमी सिद्धाराम भोसले हे घेत होते. बैलाला अनेक दिवसांपासून वैरण खाता येत नव्हती, बैलाची शिंगे खाली वाकली होती, शिंगातून रक्त येत होते, शिंगातून पू येत होता, वास येत होता. त्या बैलाचा त्रास पाहावेसा न झाल्याने याबाबतची माहिती भोसले यांनी ॲनिमल राहत या संस्थेला दिली. माहिती मिळताच अजित मोठे यांनी पाहणी केली.
advertisement
अद्रक दर कोसळले, खर्चही निघणे झाले मुश्किल, शेतकऱ्यांची चिंता वाढली, Video
घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांच्याबरोबर संपूर्ण बैलाची आणि शिंगाची पाहणी केली. डॉ.जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुरुवार 10 एप्रिल रोजी चार तास सर्जरी करीत शिंग कापून काढले. यासाठी डॉ. आकाश जाधव, भीमा शंकर, गणेश जावीर आणि बैल मालक भोसले यांनी परिश्रम घेतले. ॲनिमल राहत या संस्थेकडून या बैलाचे ऑपरेशन मोफत करण्यात आले आहे. ऑपरेशन झाल्यावर बैल मालक सिद्धाराम भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.
अशी घ्या बैलांची काळजी घ्या
बैलाच्या मालकांनी शिंगे तासू नये, शिंगाला कलर लावू नये. यामुळे बैलाच्या होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करा, तंदुरुस्त आणि सुरक्षित ठेवा आणि कॅन्सरपासून बचाव करा, असे आवाहन ॲनिमल राहतचे डॉ. आकाश जाधव यांनी केले. तसेच कोणताही जनावरास इजा झाल्यास किंवा जखमी झाल्यास अवस्थेत दिसल्यास तात्काळ राहत ॲनिमलचे संपर्क साधावे असे आवाहन डॉ.आकाश जाधव यांनी केले आहे.