2019 पासून वातावरणीय बदलांचा परिणाम आपल्याला प्रकर्षाने जाणवायला सुरुवात झाली आहे. पाऊस आला तर खूप लवकर येतो, कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतो किंवा दोन पावसामधील खंड देखील वाढल्याचे पाहायला मिळते. यासाठी विविध घटक कारणीभूत आहेत. यामध्ये लोकसंख्या वाढीमुळे झालेले जमिनीचे तुकडीकरणही कारणीभूत आहे. लोकसंख्या वाढली तसतसे जमिनीची तुकडे वाढले. यामुळे बांधबंधिस्ती कमी झाली. अतिरिक्त पाऊस आणि पाणी वाहून जाण्यास जागा शिल्लक न राहिल्याने शेती पिकांचे नुकसान होत आहे, असे वासरे सांगतात.
advertisement
देवा नको अंत पाहू..;सोन्यासारखं पिक पाण्यात वाहून गेलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
प्रत्येक महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे ठरलेले आहे. जालना जिल्ह्यात जून महिन्यामध्ये 175, जुलैमध्ये 175, ऑगस्टमध्ये 140 ते 160 तर सप्टेंबर मध्ये 140 ते 150 तर ऑक्टोबर मध्ये 40 मिलीमीटर एवढा पाऊस होतो. सरासरी पर्जन्यमान हे 700 मिलिमीटरच्या आसपास आहे. परंतु, 2025 मध्ये केवळ सप्टेंबर महिन्यातच 400 मिलिमीटर एवढा पाऊस झालाय. वार्षिक सरासरीच्या 65 टक्के पाऊस हा केवळ एकाच महिन्यात झालाय. हे सर्व वातावरणीय बदलाचा परिणाम असल्याचे ते सांगतात.
या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी कमी, मध्यम आणि जास्त पाण्याला सक्षम असे पिकांचे वाण विकसित करावे लागतील. खरिपापूर्वी दुष्काळ, सरासरी पाऊस आणि अतिरिक्त पाऊस यासंबंधी नियोजन करावं लागेल, असं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सांगितलं.