TRENDING:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीचा निशीथकाल म्हणजे काय? यंदा कधी आणि कशी करावी शिवपूजा?

Last Updated:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला निशीथकालात केलेली पूजा, अभिषेक, जप, नामस्मरण आणि उपासना अत्यंत पुण्यदायी मानली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अतिशय महत्त्व आहे. येत्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील संकट दूर होण्यास मदत होते आणि जीवनात सुख-समाधान प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवभक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी एखाद्या विशिष्ट काळात महादेवाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. तो काळ म्हणजे निशीथकाळ, जो अत्यंत पवित्र मानला जातो. निशीथकाळ म्हणजे काय? आणि तो का महत्त्वाचा आहे? याविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement

निशीथकाल म्हणजे काय?

शिवभक्तासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री. याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास महादेवाचे दिव्य आणि तेजस्वी तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात सक्रिय होतं अशी धार्मिक मान्यता आहे. या मध्यरात्रीच्या कालखंडालाच निशीथकाल असे म्हटलं जातं. याकाळात केलेली पूजा, अभिषेक, जप, नामस्मरण आणि उपासना अत्यंत पुण्यदायी मानली जाते. त्यामुळे अनेक भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषत: निशीथकालातच व्रत आणि पूजा करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, या काळात शिवतत्त्वाचे प्रभाव अधिक असल्यामुळे भक्तांनी केलेली आराधना अधिक फलदायी ठरते. यंदा 15 फेब्रुवारीच्या उत्तररात्री 12 वाजून 28 मिनिटे ते 1 वाजून 18 मिनिटे या कालावधीत निशीथकाल आहे.

advertisement

Shiv Mandir: मुंबईजवळ आहे 966 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर, महाशिवरात्रीला इथं नक्की भेट द्या, असं पोहोचाल!

View More

महादेवांची पूजा कशी आणि कधी करावी?

महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त दिवसभरात कोणत्याही वेळी महादेवाची पूजा करू शकतात. मात्र धार्मिक मान्यतेनुसार रात्रीचा काळ अधिक शुभ मानला जातो. विशेषतः मध्यरात्रीची वेळ, ज्याला निशीथकाळ म्हणतात, ही शिवपूजेसाठी अत्यंत पवित्र समजली जाते. अनेक ठिकाणी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत वेगवेगळ्या प्रहरांमध्ये पूजा करण्याची पद्धत आहे. पूजेसाठी प्रथम स्नान करून स्वच्छ आणि साधे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर शिवलिंगावर जल किंवा दुग्धाभिषेक करावा. बेलपत्र, फुले अर्पण करून धूप-दीप लावावा आणि ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करून पूजेची सांगता करावी.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीचा निशीथकाल म्हणजे काय? यंदा कधी आणि कशी करावी शिवपूजा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल