मेथी
मेथी ही रब्बी हंगामातील सर्वाधिक लोकप्रिय आणि नफा देणारी पालेभाजी आहे. तिचे पीक २५ ते ३० दिवसांत तयार होते, त्यामुळे अल्पावधीत अनेक हप्त्यांमध्ये उत्पादन घेता येते. मेथीची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान करावी. एका एकरावर लागवड केल्यास सुमारे ८ ते १० क्विंटल हिरवी मेथी मिळू शकते. सध्या बाजारात मेथीला २५ ते ४० रुपये किलो दर आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकरी ५० हजार ते १ लाख रुपये निव्वळ नफा मिळवू शकतात.
advertisement
पालक
पालकाची मागणी वर्षभर असली तरी हिवाळ्यात ती सर्वाधिक असते. पालकाचे पीक ३० ते ४० दिवसांत काढणीस तयार होते, त्यामुळे वर्षात ६ ते ७ वेळा पीक घेता येते. एका एकरावरून सुमारे ८ ते १२ क्विंटल पालक मिळतो. थंडीच्या दिवसांत त्याचा दर २० ते ३० रुपये प्रति किलो राहतो. हॉटेल्स, बाजारपेठा आणि सुपरमार्केटमध्ये त्याला सतत मागणी असते. या पिकातून शेतकरी सहजपणे ८० हजार ते १.२ लाख रुपये कमवू शकतात.
कोथिंबीर
कोथिंबीर ही जलद वाढणारी आणि अल्पावधीत विक्रीयोग्य होणारी पालेभाजी आहे. लागवडीपासून फक्त २० ते २५ दिवसांत काढणी करता येते. एका एकरावरून सुमारे ६ ते ८ क्विंटल कोथिंबीर मिळते. बाजारात दर ४० ते ६० रुपये किलो दरम्यान मिळतो. हॉटेल उद्योग आणि दैनंदिन वापरामुळे याची मागणी नेहमीच स्थिर असते. योग्य सेंद्रिय खते आणि ड्रिप सिंचन वापरल्यास हे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. एका हंगामात १ लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.
शेपू
थंडीच्या काळात शेपू या पालेभाजीची मागणी झपाट्याने वाढते. या भाज्या ३० ते ३५ दिवसांत विक्रीस तयार होतात. एका एकरावरून ७ ते ९ क्विंटल उत्पादन मिळते. ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत याला उत्तम मागणी असून, या पिकांतून शेतकरी ७० हजार ते १ लाख रुपये नफा कमवू शकतात.
शेतीसाठी काही टिप्स
बीजप्रक्रिया करून दर्जेदार बियाणे वापरा. सेंद्रिय खतांचा आणि कंपोस्टचा वापर वाढवा. ड्रिप सिंचन व मल्चिंगचा वापर केल्यास पाणी आणि खतांची बचत होते. पालेभाज्या स्थानिक बाजारपेठेत किंवा थेट ग्राहकांना विकल्यास जास्त नफा मिळतो.