सोलापूर : सध्याच्या घडीला शेतकरी पारंपरिक शेतीतून खर्चही निघत नसल्याने आधुनिक शेतीकडे वळत आहेत. सोलापुरातील शेतकरी दिनेश भोसले यांनी रंगाने हिरवट, चवीला गोड आणि बाजारात मागणी असणाऱ्या चेकनेट बोराच्या शेतीतून अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येते हा विचार करून त्यांनी ही शेती केली आहे.
advertisement
सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील पापरी या गावातील प्रयोगशील शेतकरी दिनेश नागनाथ भोसले यांचे शिक्षण नववी पर्यंत झालेले आहे. दिनेश हे आधी उमराण या बोरांच्या झाडांची लागवड करत होते. मात्र उमराण या बोरांच्या विक्रीतून खर्चही निघत नव्हता. त्यानंतर शेतकरी दिनेश यांनी उमराण या बोरांच्या झाडांना कलम करून चेकनेट भोरांची लागवड केली आहे.
AI च्या मदतीने केली उसाची शेती, कमी खर्चात भरघोस उत्पन्न, कसा मिळाला फायदा?
चेकनेट बोरांना मागणी जास्त आणि खर्च कमी असल्याने या बोरांच्या झाडाची लागवड त्यांनी एका एकरात केली आहे. एका एकरात दिनेश भोसले यांनी 160 चेकनेट बोरांच्या रोपांची लागवड केली आहे. चेकनेट बोरांच्या रोपांचा कलम भरण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. बाजारात चेकनेट बोरांना भाव 50 रुपयांपासून ते 100 रुपये किलो पर्यंत आहे.
सोलापूर जिल्ह्यासह पुणे, पंढरपूर या ठिकाणी चेकनेट बोर विक्रीसाठी पाठवण्यात येतात. चेकनेट बोरांच्या एक किलोच्या जाळीच्या पिशव्या भरून ते बाजारात विक्रीसाठी पाठवतात. चेकनेट बोराच्या विक्रीतून दिनेश भोसले यांना अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. चेकनेट बोरे नारिंगी- पिवळसर रंगाची, स्वादिष्ट, गोड आणि आकारालाही चांगली असतात.
शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल या पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि शेती परवडेल, अशी माहिती शेतकरी दिनेश भोसले यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.