खर म्हणजे जानेवारी महिन्यात लिंबाच्या रोपाची वाढ थांबते. तसेच फळे येणे देखील थांबते पण जर बायोझाइम हे सेंद्रिय उत्पादन वापरले तर झाडाला पानांपेक्षा फळे जास्त लागतील.
बायोझाइम हे एक नैसर्गिक उत्पादन आहे. लिंबाच्या रोपाला बायोझाइम जोडल्याने फळे आणि फुले दोन्हीचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढते. वनस्पतीची वाढ देखील वेगाने होते. बायोझाइममध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, अजैविक क्षार, एस्कोफिलम नोडोसम, व्हिटॅमिन के असे अनेक घटक असतात. ज्यामुळे लिंबाचा आकारही वाढतो. त्यामुळे लिंबाच्या झाडासाठी बायोझाइमचा वापर नक्की करावा
advertisement
बायोझाइमचा वापर कसा कराल?
दरम्यान, लिंबाच्या रोपाला बायोझाइम घालण्यासाठी सुरवातीला 1 लिटर ताजे पाणी घ्या. त्यात एक चमचा बायोझाइम घाला आणि चांगले मिसळा. मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झाल्यानंतर लिंबाच्या रोपाच्या मुळांजवळ खोदून तयार केलेले द्रव खत घाला. हे द्रव खत महिन्यातून फक्त एकदाच वापरावे. असे केल्यास काही दिवसांनी लिंबाचे झाड फळांनी भरलेले दिसून येईल.
