जालना : खाद्य तेलाच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचं अक्षरशः कंबरडे मोडले आहे. खाद्यतेलाचे दर 140 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचले आहेत. मात्र दुसरीकडे सोयाबीनला केवळ 4000 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर बहुतांश बाजार समितीमध्ये मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी असून देखील खाद्यतेलाचे दर वाढलेले का आहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांना देखील पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर आम्ही जालन्यातील तेल उद्योजक कपिल चावला यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर सरकार देखील सोयाबीनला तेलबियाच्या श्रेणीमध्ये ठेवते. मात्र तसं पाहायला गेल्यास सोयाबीन पासून केवळ 18 टक्के तेल निघते. तर 82 टक्के सोया पेंड तयार होते. त्यामुळे सोयाबीनला तेलबियामध्ये गणना करणे हेच चुकीचे ठरत आहे. त्यामुळे तसाही खाद्यतेल्याचा वाढलेला भाव आणि सोयाबीनचे पडलेले भाव यांचा फारसा संबंध नाही, असं चावला यांनी सांगितलं.
पानगळ होईल अन् झाड वाळून जाईल; पेरूच्या बागेची लगेच घ्या काळजी, धोकादायक रोगावर उपाय
राहिला प्रश्न सोया पेंडेचा, तर भारतात तयार होणाऱ्या सोया पेंडला अर्जेंटिना, अमेरिका अशा देशांशी स्पर्धा करावी लागते. या देशांमध्ये सोयाबीनचे उत्पन्न प्रचंड आहे. त्यामुळे कमी भावात सोयाबीनची विक्री केल्यानंतर देखील या देशातील व्यावसायिक नफ्यात राहतात. भारतात एकरी सोयाबीन उत्पादन 8 क्विंटलच्या आसपास आहे. ते अमेरिका आणि अर्जेंटिना ब्राझील अशा देशांमध्ये 25 ते 30 क्विंटलच्या आसपास आहे. ज्या देशांमध्ये जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन वाहनांना परवानगी असल्यामुळे या देशांची उत्पादकता अधिक आहे मात्र भारत सरकारने आणखी शेतकऱ्यांना जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन बियाणेची लागवड करण्यास परवानगी दिलेली नाही.
बापरे! एवढं मोठं सीताफळ, 3 माणसं लागतील संपवायला, जालन्यातील शेतकऱ्याची कमाल
अर्जेंटिना आणि ब्राझील यासारखी देश पेसू या करन्सीमध्ये व्यवहार करतात तर भारत रुपयाला डॉलरमध्ये रूपांतरित करून सोयाबीनचे व्यवहार करतो. भारतासाठी डॉलरची किंमत ही फार मोठी असते. त्यामुळे देखील काही प्रमाणात अडचणी येतात. एक तर केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना सोया पेंड निर्यातीसाठी अनुदान द्यावे किंवा शेतकऱ्यांना गणितीय बदल केलेल्या बियाण्याची लागवड करण्यास परवानगी द्यावी. यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल, असं तेल व्यावसायिक कपिल चावला यांनी सांगितलं.





