पानगळ होईल अन् झाड वाळून जाईल; पेरूच्या बागेची लगेच घ्या काळजी, धोकादायक रोगावर उपाय
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Peru Farming: सध्याच्या काळात फळबागांच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. त्यात पेरूच्या शेतीला विशेष पसंती असते. पण पेरूच्या बागेवर येणाऱ्या रोगामुळे हातची बाग वाया जाऊ शकते.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: सध्याच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकरी पेरूच्या शेतीकडे वळत आहेत. बाजारात चांगला दर आणि बारमाही मागणी यामुळे शेतकऱ्यांचा कल पेरूच्या शेतीकडे वाढत आहे. परंतु, फळबागांच्या शेतीला रोगांचा धोका अधिक असतो. तसेच पेरूच्या बागेलाही निमॅटोड रोगाचा धोका जास्त असतो. या रोगाला वेळीच रोखण्याची गरज असते. अन्यथा पूर्ण झाडच संपण्याची शक्यता असते. त्यामुळे निमॅटोडपासून पेरूच्या बागेचे रक्षण कसे करावे? याबाबत सांगलीतील बागायतदार उदय पाटील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
निमॅटोड रोगाची लक्षणे
पेरूच्या वाढीस लागलेल्या झाडाची पाने अचानक पिवळी पडू लागतात. पाने अकुंचल होतात, झाड नर्वस झाल्यासारखे दिसू लागते. तसेच झाडाची पाने, फांद्या वाळू लागतात. त्यामुळे झाड पूर्णपणे वाळून जाण्याचा धोका असतो.
काय घ्यावी काळजी?
निमॅटोड झाल्यानंतर औषधउपचार करण्यापेक्षा निमॅटोड होऊच नये यासाठी फळ बागायतदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काळजी म्हणून वर्षातून दोन वेळा सूत्रकृमीनाशक औषध जमिनीमध्ये सोडावे. निमॅटोडची लक्षणे दिसताच शेतकरी मित्रांनी अतिशय जलद गतीने उपाययोजना कराव्यात. यासाठी निमॅटोडचा नाश करणारे सूत्रकृमीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते योग्य त्या प्रमाणे जमिनीत सोडावे, असे पाटील सांगतात.
advertisement
कधी कधी पेरू बागेमध्ये अचानक रोपांची मर होते. बहरात आलेली झाडे अचानक सुकू लागतात. पाने, फुले आणि फळे ही वाळू लागतात. यामुळे कष्टाने जतन केलेली फळझाडे मरू शकतात. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी सूत्रकृमींपासून पासून होणाऱ्या निमॅटोड रोगाची लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण करणे गरजेचे ठरेल.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Nov 15, 2024 12:12 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पानगळ होईल अन् झाड वाळून जाईल; पेरूच्या बागेची लगेच घ्या काळजी, धोकादायक रोगावर उपाय







