तंत्रज्ञानाचा वापर बक्कळ फायदा
बाळचंद्र पाटील यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्राचा अवलंब केला. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत प्लास्टिक आच्छादन (मल्चिंग) करून टरबूज लागवड करण्यात आली. आणि त्याचा त्यांना मोठा फायदाही झाला.
दोन टप्प्यात केली लागवड
बालचंद्र पाटील यांनी गोंडगाव शिवारातील आपल्या शेतात दोन टप्प्यांत टरबूज लागवड केली. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अडीच एकर क्षेत्रात टरबुजांच्या रोपांची लागवड केली. तर दुसरीकडे या क्षेत्रातून पहिल्या तोडीत सुमारे ४८ टन टरबूज उत्पादन मिळालं. या टरबूजाला प्रतिकिलो २२ रुपये असा चांगला बाजारभाव मिळाला. त्यामुळे या टप्प्यात सुमारे १० लाख ५० हजार रुपयांची विक्री झाली.
advertisement
२ लाखांचा खर्च आला
पाटील यांना या लागवडीसाठी खत, औषध फवारणी, मजुरी आणि इतर खर्च मिळून सुमारे २ लाख रुपये खर्च झाला. पहिल्या तोडीनंतर अजून सुमारे २० टन उत्पादन मिळाले.
दुसऱ्या टप्प्यात १० जानेवारी रोजी शेजारच्या पावणेदोन एकर क्षेत्रात टरबूज लागवड करण्यात आली. या क्षेत्रातून सुमारे ३० टन टरबूज उत्पादन मिळाले. या टरबूजाला प्रतिकिलो २५ रुपये ५० पैसे असा अधिक दर मिळाला. या लागवडीसाठी जवळपास १ लाख रुपयांचा खर्च झाला.
मालाला थेट दिल्लीतून मागणी
टरबूजाची उच्च दर्जा आणि वाढती मागणी पाहता त्यांचा शेतमाल दिल्लीत पोहोचला. व्यापरांची पसंती वाढल्याने टरबूज दिल्ली मार्केटला पाठवण्यात आला .
एकूणच त्यांना पावणे चार एकर टरबूज पिकातून तब्बल १८ लाखांचे उत्पन्न मिळाले. आहे त्यातील ३ लाख रुपये खर्च वजा झाला.आणि १५ लाख रुपये शिल्लक राहिले.
कुटुंबाची मिळाली साथ
या संपूर्ण यशमागे पाटील यांच्या कुटुंबाची मोठी साथ लाभली. लहान मुलगा शंकर पाटील यांच्या सह्हयाने पिकाचे योग्यरित्या नियोजन केले आणि यश मिळवलं.
