पारंपरिक पद्धतीने पिक न घेता नंदकुमार लोखंडे यांनी पाऊण एकरात गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. एका फुटावर तीन बियाणे अशा पद्धतीने पाऊण एकरात नंदकुमार यांनी गुलछडीची लागवड केली आहे. गुलछडी या फुलाची लागवड केल्यावर जास्त फवारणीचा खर्च नसून फक्त पाणी जास्त द्यावे लागते.
advertisement
गुलछडी या फुलाची लागवड केल्यावर चार महिन्यांनंतर फुले येण्यास सुरुवात होते. एकदा लागवड केलेल्या गुलछडी पासून तीन वर्षे फुले मिळतात. तर या गुलछडी फुलाची जोडीने दररोज तोडून मुंबई येथील दादर फूल मार्केट येथे विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे. पाऊण एकरातून दररोज 30 किलोपर्यंत गुलछडी विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत.
सध्या गुलछडीला बाजारात 40 रुपये किलोने दर मिळत आहे. सण-उत्सवाच्या काळात याच गुलछडीला 100 रुपये किलो दराने भाव मिळतो. गुलछडीची लागवड केल्याने खुरपणी खर्च वाचतो तसेच फवारणीचा देखील खर्च वाचतो. एकदा शेणखत घालून गुलछडीची लागवड केल्यावर उत्पन्न सुरू होते.
शेतकऱ्यांनी जर गुलछडी फुलाची लागवड केली तर त्यांचा औषध फवारणीवर होणारा खर्च आणि इतर खर्च वाचेल आणि उत्पन्न देखील भरघोस मिळेल असा सल्ला शेतकरी नंदकुमार लोखंडे यांनी दिला आहे. तर या एकदा लागवड केलेल्या गुलछडीतून पाऊण एकरातून लोखंडे यांनी आतापर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्न मिळवले आहे.