पुणे : सर्वांच्या जेवणाचा भाग असलेलं लसणाने यंदाच्या वर्षी उच्चांकी भाव गाठला होता. तर पुण्यातील लसणाची आवक घटल्यामुळे अफगाणिस्तानमधून आवक ही होत आहे. काही दिवसापूर्वी लसूण हा 500 रुपये किलोपर्यंत गेला होता. त्यामुळे मार्केट यार्ड बाजारात आता अफगाणिस्तानमधील लसूण पाहायला मिळत आहे. तर सध्याचे काय दर आहेत? किती आवक होते? याविषयी माहिती जाणून घेऊ.
advertisement
गेल्या 30 वर्षातला लसणाच्या दराने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. देशभरातील लसणाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या मागणीमुळे लसणाचे दर वाढत होते. वाढत्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून लसणाची आयात होऊ लागली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आवक ही नियंत्रणात आली आहे. नवीन आवक सुरू होईपर्यंत पुढील दोन महिने दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.
पुणे बाजार समितीमध्ये लसणाची आवक ही मध्य प्रदेश आणि गुजरात येथून होत असते. देशी लसणाचे दर हे जास्त आहेत. तुलनेने पाहिलं तर अफगाणिस्तानमधील लसणाचे दर कमी आहेत. त्याची क्वालिटी देखील चांगली असल्यामुळे पसंती मिळत आहे. किरकोळ बाजारात 500 रुपये पर्यंत दर हे गेले होते. परंतु मार्केटमध्ये हे दर 400 पर्यंत होते. परंतु आता हे दर 300 ते 350 पर्यंत आहेत. लसूण महाग होण्याची कारणे पाहिली तर ते मागील वर्षीच जे वातावरण पाहिलं तर पाऊस जास्त होता. त्याचप्रमाणे थंडी देखील उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे हवं तसं अनुकूल वातावरण नसल्यामुळे उत्पादन हे कमी झालं आहे. यामुळे पुरवठा हा घटला आणि परिणामी दर हे जास्त आहेत.
अफगाणिस्तान लसणाचे दर हे 320 ते 340 रुपये इतके आहेत. तर आठवड्याला 20 ते 30 टन ही आवक होत आहे. हे दर साधारण 20 जानेवारीपर्यंत असेच राहतील. नंतर नवीन उत्पादन आल्यावर थोडं कमी होतील. अशी माहिती व्यापारी समीर रायकर यांनी दिली आहे.





