TRENDING:

परदेशात अभ्यास दौरा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार किती पैसे देते?

Last Updated:

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील प्रगत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘विदेश शेती अभ्यास दौरा’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील प्रगत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘विदेश शेती अभ्यास दौरा’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण पद्धतींचे निरीक्षण, तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याचा उपयोग आपल्या शेतकी विकासासाठी करणे शक्य होणार आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करावा लागतो. नंतर जिल्हास्तरावर ठरविण्यात आलेल्या लक्षांकानुसार सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते. ही निवड पूर्णपणे पारदर्शक आणि नियमांनुसार केली जाते.

निवड झाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अधिकृत माहिती दिली जाईल. यानंतर कृषी आयुक्तालयाच्या मार्फत प्रत्यक्ष परदेश दौऱ्याचे आयोजन केले जाईल.

advertisement

अनुदान व खर्च तपशील

या योजनेअंतर्गत सरकार दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50% किंवा कमाल 1,00,000 इतके अनुदान देत आहे. उर्वरित खर्च शेतकऱ्यांनी स्वतः भरायचा असतो. मात्र, ही रक्कम फक्त अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतरच भरायची आहे.

शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्ती, एजन्सी, ट्रॅव्हल कंपनी यांना आगाऊ पैसे देऊ नयेत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

advertisement

सावधगिरी आणि अफवांपासून संरक्षण

अलीकडच्या काळात सोशल मीडियावर या योजनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. काही पोस्ट्समध्ये दौऱ्यासाठी पैसे आगाऊ भरण्याचे आमिष दाखवले जात आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट माहितीला बळी पडू नये, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. खऱ्या माहितीकरिता तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.

advertisement

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इतर देशांमधील उच्च तंत्रज्ञान आधारित शेती, सेंद्रिय शेती, ड्रोन वापर, जल व्यवस्थापन, बाजार व्यवस्था आणि प्रक्रिया उद्योग यांचा अनुभव मिळणार आहे. हे ज्ञान आपल्या शेतीत वापरून शेतकरी उत्पादन वाढ, खर्च कमी आणि नफा वाढवू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शेती क्षेत्राशी जोडला जाण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी एक अमूल्य संधी ठरणार आहे. योग्य मार्गदर्शन, पात्रता आणि काळजी घेतल्यास या संधीचा पुरेपूर लाभ घेता येईल.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
परदेशात अभ्यास दौरा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार किती पैसे देते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल