TRENDING:

कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज प्रमुख शेतमालाच्या दरांवर घसरणीचा दबाव दिसून आला. शनिवारी नोंदवलेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या दरात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज प्रमुख शेतमालाच्या दरांवर घसरणीचा दबाव दिसून आला. शनिवारी नोंदवलेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या दरात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाहुयात, 1 फेब्रुवारी रोजी प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
advertisement

कांद्याच्या दरात घट, पुण्यात सर्वाधिक आवक

आज राज्यभरात कांद्याची एकूण 66 हजार 487 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये पुणे बाजारात 20 हजार 558 क्विंटल लोकल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. पुणे बाजारात कांद्याला किमान 700 ते कमाल 1 हजार 567 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दरम्यान, सातारा बाजारात कांद्याला 2 हजार रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक दर मिळाला असला, तरी शनिवारीच्या तुलनेत एकूणच कांद्याच्या दरात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

सोयाबीनच्या बाजारातही घसरण

सोयाबीनच्या दरातही आज नरमाई पाहायला मिळाली. राज्यातील बाजारांत सोयाबीनची केवळ 109 क्विंटल आवक झाली असून, आज सोयाबीनची आवक फक्त लातूर बाजारात नोंदवण्यात आली. या ठिकाणी सोयाबीनला किमान 5 हजार 500 ते कमाल 5 हजार 705 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शनिवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे बाजारातून स्पष्ट झाले आहे.

advertisement

तुरीच्या दरातही दबाव कायम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तुरीच्या दरातही आज घसरण नोंदवण्यात आली. राज्यभरात तुरीची एकूण 141 क्विंटल आवक झाली. यामध्ये अहिल्या नगर बाजारात 87 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक झाली. या बाजारात तुरीला किमान 8 हजार ते कमाल 8 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मात्र, शनिवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरातही घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल