पार्ट टाइम शेती म्हणजे काय?
पार्ट टाइम शेती म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय करत असतानाच मोकळ्या वेळेत शेती करणे. यात आपण शेतात रोज काम न करता, तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा कामगारांच्या साहाय्याने उत्पादन घेऊ शकतो. यासाठी योग्य पीक निवड, सिंचन व्यवस्था आणि विपणन नियोजन गरजेचे आहे.
कोणत्या प्रकारची शेती फायदेशीर ठरते?
भाजीपाला शेती
advertisement
कमी कालावधीत चांगले उत्पादन देणारी शेती म्हणून टोमॅटो, मिरची, भेंडी, कोथिंबीर आणि पालक यासारखी पिके उत्तम आहेत. या पिकांमधून २-३ महिन्यांत चांगले उत्पन्न मिळते.
मशरूम शेती
कमी जागेत, घरातील खोलीत किंवा शेडमध्ये करता येणारी मशरूम शेती आज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. एका छोट्या युनिटमधून वर्षभरात ३ ते ५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
फुलांची शेती
जास्वंद, झेंडू, गुलाब आणि रजनीगंधा यासारखी फुले सण-उत्सव आणि बाजारात कायम मागणीत असतात. कमी भांडवलात चांगला नफा मिळवता येतो.
औषधी वनस्पती शेती
अश्वगंधा, तुलस, सफेद मुसळी, अलोवेरा यांसारख्या औषधी वनस्पतींची शेती आयुर्वेदिक कंपन्यांकडून थेट खरेदी केली जाते. या पिकांमधून दीर्घकालीन आणि स्थिर उत्पन्न मिळते.
फळबाग शेती
जर शेतात पाणी आणि जागा पुरेशी असेल, तर पपई, केळी, सीताफळ, डाळिंब, चिकू अशी फळे लावणे फायदेशीर ठरते. या पिकांमधून नियमित आणि जास्त दराने उत्पन्न मिळते.
पार्ट टाइम शेतकऱ्यांसाठी काही टिप्स
तंत्रज्ञानाचा वापर करा: ऑटोमॅटिक ड्रिप सिंचन, सोलर पंप, मोबाइल अॅप्सच्या मदतीने शेतीचे नियोजन करा.
विश्वासू कामगार ठेवा: तुम्ही नोकरीवर असताना शेती सांभाळण्यासाठी एक-दोन लोकांची मदत घ्या.
थेट विक्री करा: बाजारात, ऑनलाइन किंवा स्थानिक ग्राहकांशी थेट संपर्क ठेवा. त्यामुळे दलालांवरील खर्च टाळता येतो.
लघुउद्योगाशी जोडणी करा: शेतीतील उत्पादनांपासून मूल्यवर्धित वस्तू तयार करा.जसे की, सुकवलेले मशरूम, भाजीपाला पावडर, फुलांचा अगरबत्ती वापर इत्यादी.
