TRENDING:

सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्यांचे संकट! नियंत्रण कसं मिळवायचं? एक्स्पर्टचा सल्ला

Last Updated:

Agriculture News : जुलै ते ऑक्टोबर दरम्यान सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात आढळणारी चक्रीभुंगा ही कीड शेतकऱ्यांसाठी मोठं संकट ठरत आहे. पेरणीनंतर साधारण एक महिन्यानंतर तिचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि तो थेट काढणीपर्यंत कायम राहतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जुलै ते ऑक्टोबर दरम्यान सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात आढळणारी चक्रीभुंगा ही कीड शेतकऱ्यांसाठी मोठं संकट ठरत आहे. पेरणीनंतर साधारण एक महिन्यानंतर तिचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि तो थेट काढणीपर्यंत कायम राहतो. जर हवामान पोषक राहिलं तर या किडीमुळे तब्बल 90-100% झाडांवर प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे उत्पादनात 30 ते 60% पर्यंत घट येऊ शकते.
Agriculture News
Agriculture News
advertisement

चक्रीभुंगा कसा ओळखावा?

प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असून 7–10 मिमी लांब असतो. त्याच्या पंखांचा अर्धा भाग काळसर असतो.

मादी भुंगा झाडाच्या खोडावर व फांद्या यावर दोन गोलाकार काप (चक्रकाप) करते व त्यामध्ये 75–80 अंडी घालते.

अंडी फिकट पिवळसर रंगाची, लांबट असतात. अंड्यांमधून 3 ते 4 दिवसांत अळी बाहेर येते. अळी खोड पोखरत सरळ मुळापर्यंत जाते आणि झाड वाळते. पूर्ण वाढ झालेली अळी पुढील पावसाळ्यापर्यंत खोडात सुप्तावस्थेत राहते. पहिल्या पावसानंतर ती कोषावस्थेत जाते. प्रौढ भुंगा पुन्हा अंडी घालतो.

advertisement

लक्षणं काय?

झाडं अचानक वाळतात. शेंगांची संख्या आणि दाण्यांचं वजन घटतं. काढणीच्या वेळी चक्रकाप झालेल्या खोडाचे तुकडे होतात. जर पीक 15 ते 20 दिवसांचे असतानाच प्रादुर्भाव झाला, तर नुकसान अधिक प्रमाणात होते. ही कीड फक्त सोयाबीनपुरती मर्यादित नसून मूग, उडीद, तूर, भुईमूग, मिरची, कारली या पिकांवरही आढळते.

चक्रीभुंगा नियंत्रणासाठी उपाययोजना

advertisement

शेती व्यवस्थापन

पेरणीनंतर कोळपणी व खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवा. नत्र खत शिफारशीनुसारच वापरा.अधिक नत्र दिल्यास कीड वाढते.

प्रभावी निरीक्षण आणि अंडी नष्ट करणे

झाडांवरील चक्रकापाचे भाग लक्षात घ्या.अशा झाडांच्या फांद्या तोडून अळी नष्ट करा.

सेंद्रिय फवारणी

पेरणीनंतर 20 व 35 दिवसांनी निंबोळी अर्क (5%) किंवा अॅझाडिरॅक्टिन (1000 ppm) 20-30 मि.लि./10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

advertisement

रासायनिक नियंत्रण (कीटकनाशक बदलत फवारावीत)

वेळ (पेरणीनंतर)                         औषध (डोस प्रति 10 लि.)

20–25 दिवस                          थायामेथोक्साम + लाम्ब्डा-सायहॅलोथ्रिन (८ मि.लि.)

30–35 दिवस                           थायक्लोप्रिड (25 मि.लि.)

45–50 दिवस                          क्लोरअ‍ॅन्ट्रानिलिप्रोल (6 मि.लि.)

60–65 दिवस                           इमामेक्टिन बेंझोएट (10 ग्रॅम)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
सर्व पहा

दरम्यान, चक्रीभुंगा ही कीड क्षुल्लक वाटली तरी ती संपूर्ण हंगामात उत्पादनावर खोल परिणाम करते. त्यामुळे शिस्तबद्ध निरीक्षण, शेती व्यवस्थापन, आणि सेंद्रिय व रासायनिक नियंत्रण या सर्व एकात्मिक पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकरी उत्पादनातील मोठ्या नुकसानीपासून स्वतःचे रक्षण करू शकतात. वेळेवर उपाय केल्यास पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाचवता येईल.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्यांचे संकट! नियंत्रण कसं मिळवायचं? एक्स्पर्टचा सल्ला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल