advertisement

AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल बर्फासारखी गार, किंमत ऐकून बसेल शॉक!

Last Updated:

वाढत्या उष्णतेत आणि वाढत्या वीजबिलाच्या काळात सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमधील अकरावी सायन्सच्या विद्यार्थिनींनी एक अनोखा एसी तयार केला आहे.

+
News18

News18

सोलापूर : वाढत्या उष्णतेत आणि वाढत्या वीजबिलाच्या काळात सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमधील अकरावी सायन्सच्या विद्यार्थिनींनी एक अनोखा एसी तयार केला आहे. सोलापूर शहरातील विडी घरकुल येथे राहणाऱ्या तनुश्री दोडे आणि तिच्या मैत्रिणींनी सोलर पॅनलवर चालणारा प्रदूषणमुक्त सोलर एनेबल एअर कंडिशनर तयार केला आहे. हा एसी केवळ विजेची बचत करत नाही, तर बाहेरील दूषित हवा फिल्टर करून शुद्ध थंड हवा पुरवतो.
तनुश्री दोडेने सांगितले, वीजदर वाढत आहेत आणि एसीची मागणी वाढली आहे. आम्ही विचार केला आणि सोलर पॅनल, थर्माकोल बॉक्स, आईस बॉक्स, दोन एक्झॉस्ट फॅन आणि बॅटरी वापरून हा एसी बनवला. दिवसा सोलरवर चालतो आणि रात्री बॅटरीवर 8 ते 9 तास टिकतो. त्यामुळे विजेची गरजच नाही. 10 बाय 10 च्या खोलीत हा एसी तापमान 3-4 अंश सेल्सिअसने खाली आणतो आणि स्वच्छ हवा देतो.
advertisement
मार्केटमधील एसी महाग असतात, वीजबिल येतं आणि मेंटेनन्स खर्चिक असतो. पण हा एसी फक्त 8 हजार रुपयांत तयार होतो आणि मेंटेनन्सचा खर्च नाही. हा शोध शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाच्या दिशेने मोठा टप्पा आहे. अशा नवकल्पना बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल बर्फासारखी गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement