तनुश्री दोडेने सांगितले, वीजदर वाढत आहेत आणि एसीची मागणी वाढली आहे. आम्ही विचार केला आणि सोलर पॅनल, थर्माकोल बॉक्स, आईस बॉक्स, दोन एक्झॉस्ट फॅन आणि बॅटरी वापरून हा एसी बनवला. दिवसा सोलरवर चालतो आणि रात्री बॅटरीवर 8 ते 9 तास टिकतो. त्यामुळे विजेची गरजच नाही. 10 बाय 10 च्या खोलीत हा एसी तापमान 3-4 अंश सेल्सिअसने खाली आणतो आणि स्वच्छ हवा देतो.
advertisement
मार्केटमधील एसी महाग असतात, वीजबिल येतं आणि मेंटेनन्स खर्चिक असतो. पण हा एसी फक्त 8 हजार रुपयांत तयार होतो आणि मेंटेनन्सचा खर्च नाही. हा शोध शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाच्या दिशेने मोठा टप्पा आहे. अशा नवकल्पना बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.





