व्हॉट्सअॅपचं View Once फीचर खरंच सेफ आहे? यानेच फुटलं अशोक खरातचं बिंग
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
व्हॉट्सअॅपवरील अनेक फीचर्सवर आपण विश्वास ठेवतो. आपल्याला अॅपने सांगितलेल्या प्रायव्हेट फीचर्सवर विश्वास असतो. पण खरंच असं असतं का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात. या अशोक खरातचे काळे कारनामे नुकतेच समोर आले आणि कारवाई सुरू झाली. पण हे सत्य समोर आलं तरी कसं? झालं असं की, अशोक खरात याने त्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याची तक्रार पोलिसात केली. यामध्ये समोरची व्यक्ती अशोक खरातला त्याचे गैरवर्तनाचे व्हिडिओ हे व्हॉट्सअॅपवर View Once फीचरने पाठवत होता. पण ते अशोक खरातला एकदा पाहिल्यानंतर दिसले नाहीत. हे त्याला नंतर दिसले नसल्याने त्याने ते आता कोणाला दिसणारच नाही असा विश्वास ठेवला. यासोबतच आपले पोलिस डिपार्टमेंटमध्येही भक्त आहेत म्हणून कसंलीही भीती न बाळगता त्याने पोलिसात त्याला खंडणी मागितली जात असल्याची तक्रार केली. यानंतर तपासासाठी पोलिसांना त्याचा मोबाईल सुपूर्त केला. नेमकं तेव्हाच त्याचे सर्व काळे कारनामे हे थेट पोलिसांच्या हाती लागले.
आपल्यापैकी बरेच लोक हे व्हॉट्सअॅपच्या किंवा इतर कोणत्याही अॅपच्या प्रायव्हसी फीचरवर विश्वास ठेवत असतात. व्हॉट्सअॅपचं View Once फीचरही तसंच आहे. यामध्ये तुम्हाला एखादा पर्सनल फोटो समोरच्या व्यक्तीने फक्त एकदाच पाहायला हवा आणि त्याने सेव्ह करू नये असं वाटत असेल तर या फीचरची मदत घेता येते. कारण यामधील फोटो व्हिडिओ पुन्हा सेव्ह करता येत नाही तसंच त्याचा स्क्रिनशॉटही घेता येत नाही. यामुळे तो सर्वांना सुरक्षित वाटतो. पण हे फीचर खरंच सेफ आहे? तर अशोक खरात प्रकरणावरुन समोर येतं की हे सेफ नाही. एवढंच नाही तर तुम्ही कोणत्याही एक्सपर्टची मदत न घेता हे View Once फीचरमधील फोटो पुन्हा पाहू शकता. ते कसं पाहूया...
advertisement
व्हॉट्सअॅपच्या व्हूय वन्स फीचरमध्ये एक बग आहे. जे यूझरची प्रायव्हसी धोक्यात टाकते. समोर आलंय की, व्ह्यू वन्स फीचरने पाठवलेला फोटो गायब होण्याऐवजी, शेअर केलेल्या मीडियाला रिसीव्ह करणारा कधीही अॅक्सेस करु शकते. पण हे बग फक्त iPhone वर काम करतेय. म्हणजे iPhone यूझर तुमचे व्ह्यू वन्सचा फोटो एकदा नाही तर वारंवार अॅक्सेस करू शकतात. पाहूया कसा...
advertisement
यूझर्स अशा प्रकारे व्ह्यू वन्स फीचरला बायपास करू शकतात
- व्हॉट्सअॅप ओपन करा आणि सेटिंग्स> स्टोरेज आणि डेटावर जा.
- स्टोरे मॅनेजवर टॅप करा.
- तुमचा व्ह्यू वन्स मीडिया पाठवणाऱ्या कॉन्टॅक्टला सर्च करण्यासाठी खाली स्कोल करावं लागेल.
- त्यांच्या नावावर टॅप करा. सॉर्ट बाय निवडा आणि सर्वात नवं आधी निवडा.
- व्ह्यू वन्स मीडिया लिस्टमध्ये फोटो दिसेल. जी पुन्हा अॅक्सेस केली जाऊ शकते.
advertisement
तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तरीही हा डेटा अॅक्सेस केला जाऊ शकतो. फक्त यासाठी एक्सपर्टची टीम असावी लागते. जसं खरात प्रकरणामध्ये झालंय. काही कारणांमुळे आयफोनमध्येही हे फोटो पुन्हा अॅक्सेस करता आले नाहीत. तरीही ते फोटो समोरच्याला कधीच दिसणार नाहीत असं होत नाही. तुम्ही एखाद्या प्रकरणात अडकला तर हे सर्व फोटो एक्सपर्ट्च्या टीमला दिसू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 2:11 PM IST










