advertisement

Summer Special Drink : बडीशेप-लिंबाचं सरबत सोडा, बनवा रिफ्रेशिंग द्राक्षांचं सरबत! एकदा प्याल तर वारंवार बनवाल

Last Updated:

Grapes cold drink recipe in marathi : इथे एक द्राक्षांच्या सरबताची खास रेसिपी दिली गेली आहे. एकदा या पद्धतीनं द्राक्षांचं सरबत बनवून पाहा. याची रिफ्रेशिंग टेस्ट तुम्हाला नक्की आवडेल.

असं बनवा द्राक्षांचं सरबत
असं बनवा द्राक्षांचं सरबत
मुंबई : उन्हाळयात आपल्या घरी रसाळ फळं मोठ्या प्रमाणावर आणली जातात. त्यात द्राक्षही असतातच. द्राक्षं अशी खायलाही आपल्याला आवडतात. म्हणजे बहुतांश लोकांना द्राक्षं आवडतात. पण द्राक्षांचं एखादं रिफ्रेशिंग सरबत बनवता आलं तर.. इथे एक द्राक्षांच्या सरबताची एक खास रेसिपी दिली गेली आहे. एकदा या पद्धतीनं द्राक्षांचं सरबत बनवून पाहा. याची रिफ्रेशिंग टेस्ट तुम्हाला नक्की आवडेल.
द्राक्षांच्या सरबतासाठी आपल्याला फार काही साहित्यही लागणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त वेळी लागणार नाही. फक्त चांगली रसाळ आणि गोड द्राक्षं लागतील. ही रेसिपी aamhi_malvani_15 या इंस्टाग्राम अकाऊंटवर दाखवली गेली आहे.
द्राक्षांचं सरबत बनवण्यासाठी साहित्य..
- द्राक्षं
- साखर
- मीठ
- पुदिन्याची पानं
- चाट मसाला
- लिंबाचा रस
advertisement
- पाणी
- बर्फाचे तुकडे
- सोडा वॉटर
असं बनवा द्राक्षांचं सरबत
- सर्वात आधी द्राक्षं घ्या आणि ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामधे धुतलेली द्राक्षं टाका.
- या द्राक्षांसोबत थोडी साखर, मीठ, पुदिन्याची पानं, चाट मसाला, लिंबाचा रस आणि पाणी टाका.
- त्यानंतर हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घ्या.
advertisement
- आता काचेच्या ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे टाका.
- बर्फाच्या तुकड्यांवर हे बनवलेले द्राक्षांचे थोडे मिश्रण टाका.
- त्यानंतर त्यामध्ये थोडंस प्लेन सोडा वॉटर घाला.
- ग्लासला गोल चिरलेली लिंबाची फोड लावून सर्व्ह करा.



 










View this post on Instagram























 

A post shared by Aamhi malvani (@aamhi_malvani_15)



advertisement
तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणि आवडीनं हे सरबत गार्निशिंग करून सर्व्ह करू शकता. हे सरबत बनवायला अगदी सोपं आहे आणि जास्त वेळी याला लागत नाही. घरी अचानक पाहुणे आले तर तुम्ही त्यांना हे सरबत लगेच बावून देऊ शकता. तर या उन्हाळ्यात एकदा हे सरबत एकदा नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Special Drink : बडीशेप-लिंबाचं सरबत सोडा, बनवा रिफ्रेशिंग द्राक्षांचं सरबत! एकदा प्याल तर वारंवार बनवाल
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement