TRENDING:

तुम्ही वर्षानुवर्षे जमीन वापरताय पण मालकीचा पुरावा नाही, अशा स्थितीत जमिनीवर हक्क कसा मिळवायचा? नियम काय सांगतो?

Last Updated:

Property Rules : तुम्ही वर्षानुवर्षे जमीन वापरताय पण मालकीचा पुरावा नाही, अशा स्थितीत जमिनीवर हक्क मिळवता येते का? नियम काय सांगतो?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आढळते की, काही कुटुंब वर्षानुवर्षे एखादी जमीन कसत किंवा वापरत असतात, मात्र त्यांच्या नावावर त्या जमिनीचा अधिकृत मालकी हक्क नसतो. अशा वेळी आपल्याला त्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळू शकतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. यासंदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Property Rules
Property Rules
advertisement

दीर्घकाळ ताबा म्हणजे मालकी नाही

फक्त दीर्घकाळ जमीन वापरली म्हणून ती आपोआप आपल्या नावावर होत नाही.जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी स्पष्ट कायदेशीर प्रक्रिया आणि पुरावे आवश्यक असतात. मात्र काही प्रकरणांमध्ये ‘विपरीत ताबा’ (Adverse Possession) या कायदेशीर तत्त्वानुसार हक्क मागता येऊ शकतो.

‘विपरीत ताबा’ म्हणजे काय?

नियमानुसार, जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या जमिनीवर मूळ मालकाच्या परवानगीशिवाय, सलग आणि उघडपणे दीर्घकाळ ताबा ठेवला असेल, तर ठरावीक कालावधीनंतर त्या व्यक्तीला त्या जमिनीवर हक्क मागण्याची संधी मिळू शकते. भारतात सर्वसाधारणपणे हा कालावधी १२ वर्षांचा मानला जातो (खाजगी मालमत्तेसाठी). सरकारी जमिनीच्या बाबतीत हा कालावधी अधिक असतो.

advertisement

हक्क मिळवण्यासाठी आवश्यक अटी

कायद्यानुसार खालील अटी पूर्ण झाल्यासच ‘विपरीत ताबा’चा दावा करता येतो. ताबा सलग आणि खंडित नसावा.ताबा उघडपणे असावा तो गुप्त नसावा. मूळ मालकाच्या परवानगीशिवाय ताबा असावा. त्या जमिनीवर स्वतःचा हक्क असल्याप्रमाणे वापर झालेला असावा

पुरावे का महत्त्वाचे?

फक्त तोंडी दावा पुरेसा नसतो. न्यायालयात दावा करताना शेतीचे पुरावे, वीजबिल, पाणीपट्टी, कर पावत्या, पीक नोंदी, साक्षीदार यांसारखे पुरावे सादर करावे लागतात. हे सर्व दाखले ताबा सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

advertisement

न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक

असा हक्क आपोआप मिळत नाही. संबंधित व्यक्तीला न्यायालयात दावा दाखल करून आपला ताबा सिद्ध करावा लागतो. न्यायालय सर्व पुरावे तपासून निर्णय देते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

जमिनीच्या मालकीसारखा महत्त्वाचा विषय असल्याने अशा प्रकरणात कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे दावा फेटाळला जाऊ शकतो.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
तुम्ही वर्षानुवर्षे जमीन वापरताय पण मालकीचा पुरावा नाही, अशा स्थितीत जमिनीवर हक्क कसा मिळवायचा? नियम काय सांगतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल