ओलावा तयार होण्यामागचे कारण काय?
एक्स्पर्टने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वेळा अनियमित पाऊस, सकाळी पडणारे दव, ढगाळ वातावरण किंवा पिकाची घाईगडबडीत केलेली काढणी. यामुळे सोयाबीनच्या दाण्यांमध्ये ओलाव्याचे प्रमाण वाढते. बाजारात 10–12 टक्के ओलावा स्वीकारला जातो. परंतु त्याहून अधिक ओलावा असल्यास व्यापारी दर मोठ्या प्रमाणात कमी करतात. त्यामुळे शेतकरी नुकसान टाळण्यासाठी ओलावा कमी करण्याचे उपाय शोधत आहेत.
advertisement
सोयाबीनचा ओलावा कमी करण्यासाठी उपाय काय?
कडक उन्हात वाळवणे
सोयाबीनचा ओलावा कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि खर्च न होणारा उपाय आहे.
सोयाबीनचे दाणे अंगणात किंवा मोकळ्या जागेत पसरवावेत. दर 30 ते 40 मिनिटांनी ढवळावे, म्हणजे दाण्यांवर सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश पडतो. 2 ते 3 दिवसांत ओलावा नैसर्गिकरीत्या कमी होतो.
प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीचा वापर
धूळ, ओलसर जमीन किंवा माती मिसळू नये म्हणून प्लास्टिक शीटवर वाळवणे अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे दाणे स्वच्छ राहतात आणि व्यापारी सरस दाणा म्हणून अधिक दर देतात.
पॉलिश किंवा स्वच्छता प्रक्रियेमुळे ओलावा कमी
धान्यातील काडी, पाने आणि मातीचे कण आधी काढून टाकावेत. स्वच्छ धान्य लवकर कोरडे होते. काही ठिकाणी छोटे पॉलिश मशीन उपलब्ध आहेत, ज्यामुळे दाण्यांचा ओलावा कमी होतो.
ड्रायरचा वापर
अनेक ठिकाणी कृषी केंद्रे, सहकारी संस्था किंवा खाजगी व्यापाऱ्यांकडे धान्य वाळवण्यासाठी ग्रेन ड्रायर उपलब्ध आहेत. ड्रायरमध्ये धान्य 3–4 तासांत वाळते. पावसाळ्यात किंवा सतत ढगाळ हवामानात हा पर्याय फायदेशीर ठरतो. या प्रक्रियेला थोडासा खर्च लागतो पण नंतर मिळणारा चांगला बाजारभाव हा खर्च भरून काढतो.
