TRENDING:

खर्च तरी निघणार का? शेतातच करपतोय कांदा, रोगाच्या विळख्याने शेतकरी संकटात

Last Updated:

मराठवाड्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा शेतीला करपा रोगाने विळखा घातला असून खर्चही निघण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव: मराठवाड्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाळी कांद्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झालीये. तर अनेक शेतकरी कांद्याची लागवड देखील करत आहेत. मात्र गेल्या 10 ते 15 दिवसांपासून अधून मधून पडणारा पाऊस, पहाटेचे धुके आणि जमिनीतील ओलावा यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

advertisement

एक एकर कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो. खरंतर यंदा केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी केल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत. तर गत वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे कांदा उत्पादन कमी प्रमाणात झाले होते. मात्र या वर्षी खरीपातील पावसाळी कांद्याचे प्रमात वाढलेले आहे तर आता रब्बीतील म्हणजे उन्हाळी कांद्याची देखील लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

advertisement

डॉक्टरने केली पपईची शेती, आठवड्याला होतेय दीड ते दोन लाखांची उलाढाल, VIDEO

शेतकरी संकटात

पावसाळ्यात लागवड करण्यात आलेला किंवा पेरणी करण्यात आलेला कांदा काढणीसाठी अद्याप साधारणपणे महिन्याचा कालावधी बाकी आहे. मात्र ऐन कांदा फुगवणीच्या काळात कांद्यावर करपा रोगाने थैमान घातल्याने कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकदा फवारणी करूनही करपा नियंत्रणात येत नाही. त्यामुळे घातलेला खर्चही निघणार नसल्याचे भूम तालुक्यातील जेजला येथील कांदा उत्पादक शेतकरी बालाजी गटकळ यांनी सांगितलं.

advertisement

B Sc पाणीपुरीवाला, शिक्षणातून संघर्षाकडे आणि संघर्षातून यशाकडे, आता महिन्याला कमावतो 40 ते 50 हजार

का वाढलाय करपा?

ढगाळ वातावरण, अधुनमधून पडणारा पाऊस, जमिनीत नसनारा वापसा आणी धुके या कारणांमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. प्राथमिक अवस्थेपासून योग्य फवारणी केल्यास करपा रोगावर नियंत्रण मिळवता येते. तर करपा रोगाने कांद्याची पात पिवळी पडून करपते आणि कांदा जमिनीत सडतो. त्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांनी वेळीच योग्य ती फवारणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
खर्च तरी निघणार का? शेतातच करपतोय कांदा, रोगाच्या विळख्याने शेतकरी संकटात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल