या नव्या उपक्रमांतर्गत, नागरिकांनी रेशनकार्डशी संबंधित कोणताही अर्ज केल्यास, त्या अर्जाची पावती अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायची आहे. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, कोणती कार्यवाही झाली आहे, किंवा काही त्रुटी असल्यास – याची माहिती 1 ते 2 दिवसांच्या आत व्हॉट्सअॅपवरच मिळणार आहे.
ऑनलाइन अर्जानंतर लगेच अपडेट
advertisement
सध्या बहुतेक नागरिक रेशनकार्डशी संबंधित अर्ज ऑनलाइन पद्धतीने करतात. मात्र त्या अर्जावर काय कार्यवाही झाली, हे जाणून घेण्यासाठी त्यांना कार्यालयात जावे लागते. ही प्रक्रिया आता डिजिटलदृष्ट्या सुलभ करण्यात आली आहे.
या कामांवर व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार माहिती
नवीन रेशनकार्ड
दुय्यम (डुप्लिकेट) रेशनकार्ड
रेशनकार्डमधील नावे कमी करणे
नवीन नावे समाविष्ट करणे
या सर्व कामांसाठी केलेल्या अर्जांची पावती व्हॉट्सअॅपवर पाठविल्यास, संबंधित माहिती तातडीने उपलब्ध होईल.
5 मेपासून अंमलबजावणी सुरु
हा उपक्रम 5 मेपासून अकोला शहर विभागात औपचारिकरित्या सुरू करण्यात येत आहे. यामुळे रेशनकार्डसंबंधी चौकशीसाठी नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज राहणार नाही.
"हा उपक्रम नागरिकांची वेळ वाचवण्याबरोबरच कार्यपद्धतीत पारदर्शकता आणणार आहे," अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी रामेश्वर भोपळे यांनी दिली.