राज्य सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतारा काढता यावा यासाठी महाराष्ट्र भूमि अभिलेख विभागाअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वेब पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या 1980 पासूनचे सातबारा उतारे आणि फेरफार काढू शकता. सातबारा उतारे डाऊनलोड करून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता.
सातबारा उतारा कसा काढालं?
सर्वप्रथम तुम्हाला गूगल क्रोम किंवा इतर कुठल्याही वेब ब्राऊझरमध्ये जावून त्यामध्ये अभिलेख असा मजकूर
advertisement
टाईप करावा.
त्यानंतर पोर्टलवर आपली वैयक्तिक माहिती भरावी, जसे की, घराचा पत्ता, नाव, मोबाईल नंबर इत्यादी ही माहिती भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होते.
त्यानंतर उतारा काढण्यासाठी तुम्हाला जिल्हा, तालुकाम गावाचे नाव निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणता उतारा हवा आहे. त्याची निवड करावी लागते.
जर तुम्हाला सातबारा 8 अ चा उतारा हवा असेल तर तर सर्च मध्ये 8 अ असे टाइप करावं लागेल. त्यानंतर पुढे गट क्रमांक टाकून आपला उतारा शोधू शकता. तुम्हाला ज्या वर्षाचा सातबारा हवा आहे. त्या वर्षावर क्लीक करून तो काढू शकता.