सिद्धिदात्री देवीचे स्वरूप
सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान असून तिच्या चार हातांत कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र आहे. हे स्वरूप सरस्वती देवीचेही प्रतीक मानले जाते. देवी ही सर्व आठ सिद्धींची अधिष्ठात्री आहे. अणिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, गरिमा, लघिमा, इशित्व आणि वशित्व. पुराणानुसार भगवान शंकरांनी सिद्धिदात्री देवीच्या कृपेनेच या सिद्धी प्राप्त केल्या आणि त्यामुळे ते अर्धनारीश्वर म्हणून ओळखले गेले.
advertisement
Navratri 2025: देवी समोर कोहळ्याचा बळी का दिला जातो? काय आहे नेमकी परंपरा?
पूजन पद्धत
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
देवीच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालून पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.
मातेला पांढरे फुल अर्पण करून हळद-कुंकू वाहावे.
देवीला मिठाई, सुका मेवा, हंगामी फळे, पुरी, खीर, हलवा, हरभरा आणि नारळ अर्पण करावेत.
या दिवशी देवीला विशेषतः लोण्याचा नैवेद्य अर्पण करावा.
फुलांसोबतच देवीला लिंबाची माळ अर्पण करण्यालाही धार्मिक महत्त्व आहे.
नवरसयुक्त अन्न, नऊ प्रकारची फुले आणि नऊ प्रकारची फळे अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
नवमीच्या दिवशी कन्या पूजन आणि हवन यालाही विशेष महत्त्व आहे.
सिद्धिदात्री देवीची भक्तिभावाने केलेली उपासना साधकाला अष्टसिद्धी आणि नव निधींचा लाभ करून देते.