Ramayana : रावणाला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा... काय होती रामाची प्रतिक्रिया; इतिहासकारांनी केलं वर्णन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ram Ravana First Meet : रावण कसा आहे हे प्रभू रामांना विभीषणाकडून माहिती झालं होतं. रावणाचं वर्णन त्यांनी ऐकलं होतं. तरी रामाने रावणाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा...
नवी दिल्ली : रामायण तुम्ही पाहिलं, वाचलं आहेच. त्यामुळे रामायणाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. रावणाने सीतेचं अपहरण केलं, तिला लंकेत नेलं. नंतर सीतेला लंकेतून परत आणण्यासाठी राम, लक्ष्मण, हनुमान वानरसेना घेऊन लंकेत गेले. जिथं राम आणि रावणाची भेट झाली. जेव्हा रामाने रावणाला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? याबाबत इतिहासकारांनी सांगितलं आहे.
रामायणाबाबत अनेक रहस्यं आहेत. रामायणाची मूळ स्टोरी माहिती असली तरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीत किंवा सांगितल्या जात नाही. त्यापैकीच एक म्हणजे राम आणि रावणाची पहिली भेट.
कोणत्याही व्यक्तीबाबत ऐकल्यानंतर ती व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्या व्यक्तीबाबत आपण मनात एक प्रतिमा तयार करतो. ती व्यक्ती तशी असेलच असं नाही आणि आपण कल्पना केलेल्या व्यक्तीपेक्षा ती व्यक्ती प्रत्यक्षात वेगळी असेल तर ते आपल्यासाठी आश्चर्यकारक असतं. असचं काहीसं रामाने रावणाला पाहिल्यानंतरही झालं असावं.
advertisement
Ramayana : कुंभकर्ण 6 महिने झोपायचा सगळ्यांना माहितीये, पण का? इतिहासकारांनी सांगितलं वैज्ञानिक कारण
इतिहासकार निलेश ओक यांनी न्यूज18च्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, रावण कसा आहे हे प्रभू रामांना विभीषणाकडून माहिती झालं होतं. रावणाचं वर्णन त्यांनी ऐकलं होतं. तरी पहिल्यांदा रामांनी जेव्हा रावणाला पाहिलं तेव्हा त्यांनी विभीषणाला हा कोण तेजस्वी माणूस असं विचारलं.
advertisement
रावण कुणाचा अवतार होता?
रामायण बऱ्यापैकी लोकांनी वाचलं असेल, पण रावणाच्या रहस्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल. तुम्ही रामायण किंवा महाभारत किंवा हिंदू पुराणांमध्ये देवाने, देवीने तसेच राक्षसाने अवतार घेतल्याचं ऐकलं असेल.
जसं प्रभू राम हे विष्णूचे अवतार आहेत, सीता माता लक्ष्मीचा अवतार आहे, तसंच रावण देखील एक अवतार आहे. पण तो कोणाचा अवतार आहे हे अनेकांना माहित नाही.
advertisement
एका हिंदू पुराणातील माहितीनुसार रावणानंही अवतार घेतला आहे. रावणच नाही तर त्याचा भाऊ कुंभकर्णानं अवतार घेतला आहे. रावण आणि कुंभकर्ण हे जया-विजया आहेत, वैकुंठाचे दोन द्वारपाल आहेत. हिंदू धर्मात जया आणि विजया हे विष्णू देवाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाचे दोन द्वारपाल आहेत. 4 कुमारांच्या शापामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. ते सत्ययुगात हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष , त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण आणि शेवटी द्वापर युगात शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून अवतरले होते. या शापामुळे विष्णूच्या वेगवेगळ्या अवताराकडून त्यांचा मृत्यू होणं अटळ होतं.
Location :
Delhi
First Published :
September 29, 2025 5:31 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramayana : रावणाला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा... काय होती रामाची प्रतिक्रिया; इतिहासकारांनी केलं वर्णन