Ramayana : श्रीलंका रावणाची लंका नाही, मग कुठे आहे? इतिहासकारांनी सांगितलं ते ठिकाण

Last Updated:

Ramayana Ravana Lanka Place : रावणाची लंका श्रीलंकेत नव्हतीच असं इतिहास तज्ज्ञ सांगतात. मग नेमकी रावणाची लंका कुठे होती? असा प्रश्न पडतो. रावणाच्या लंकेचं ते ठिकाण इतिहास तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : रावणाची लंका कुठे होती, असं विचारलं तर बहुतेक लोक श्रीलंका असं उत्तर देतील. याशिवा श्रीलंका आणि भारतादरम्यान रामसेतू असल्याचंही सांगितलं जातं. पण खरंतर रावणाची लंका श्रीलंकेत नव्हतीच असं इतिहास तज्ज्ञ सांगतात. मग नेमकी रावणाची लंका कुठे होती? असा प्रश्न पडतो. रावणाच्या लंकेचं ते ठिकाण इतिहास तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
रामायणाबाबत अनेक पौराणिक कथा आहे. पण रामायणाचे अनेक रहस्यही आहेत. अशाच रहस्यांचा उलगडा केला आहे तो इतिहासकारांनी. त्यापैकी एक म्हणजे रावणाची लंका. रावणाची लंका नेमकी कुठे, त्याचं ठिकाण कोणतं याबाबत इतिहास संशोधक निलेश ओक यांनी न्यूज18लोकमतच्या पॉडकास्टवर याची माहिती दिली आहे.
advertisement
निलेश ओक यांनी सांगितलं की, श्रीलंका रावणाची लंका नाही, मग ती कुठे आहे. याचं वर्णन दिलेलं आहे. वाल्मिकी रामायणातही आहे. वाल्मिकी रामायणात सांगितलं आहे की, भारताच्या दक्षिण कोपऱ्यावर गेल्यानंतर पुढे तुम्हाला 100 योजनं जायला पाहिजे. म्हणजे सुमारे एक हजार किलोमीटर जायला पाहिजे. श्रीलंका तिवढी दूर नाहीच आहे. हे झालं एक.
advertisement
दुसरं म्हणजे हनुमान त्याला शोधत होता म्हणजे त्याला इकडेतिकडे जावं लागलं हे ठिक आहे. पण हनुमान लंकेतून परत आल्यानंतर तर त्याला लंका नेमकी कुठे हे माहिती आहे की नाही. मग ते किष्किंधाला आल्यानंतर वानर सेना, राम, लक्ष्मण, सुग्रीव सगळे निघतात. जर आताची श्रीलंका रावणाची लंका असती तर ते हम्पी बेलारीपासून हैदराबादकडे जाऊन खाली जातील आणि तामिळनाडू, चेन्नईकडे जातील. पण ते तसे जात नाहीत. ते सय्य माऊंटन, निलगिरी माऊंटन, मलय माऊंटन असं करत केरळच्या बाजूला जातात. ती सध्याची जागा ज्याला आपण मलय किंवा मालदिव म्हणतो जिथं लोक पर्यटनासाठी जातात. त्याच्या पूर्वेला आता तिथं काही नाही, खोल समुद्र आहे. लंकेचं काय झालं माहिती नाही पण तिथं लंका होती.
advertisement
रावणाची लंका खरंच सोन्याची होती?
इतिहासकार निलेश ओक यांनी सांगितलं, जसं जोधपूरला ब्लू सिटी, जयपूरला पिंक सिटी म्हणतात.  तशी सोनेरी लंका, सोन्याची लंका.. सोन्याची लंका म्हणजे सोन्याचे पत्रे वगैरे लावले होते का तर ते शक्य नाही, कदाचित सोन्याचा मुलामा देत असतील. सोनेरी रंग असेल.
advertisement
त्या भागाचं संशोधन करून अभ्यास केला असता एक दगड होता तो लाल आणि सोनेरी रंग यांच्या मधला रंग होता. अशा पद्धतीने त्या भिंती रंगवलेल्या होत्या, असं ओक यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramayana : श्रीलंका रावणाची लंका नाही, मग कुठे आहे? इतिहासकारांनी सांगितलं ते ठिकाण
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement