नवरात्रीची नववी माळ: संपत्ती होईल प्राप्त, देवी सिद्धिदात्रीची अशी करा पूजा

Last Updated:

नवरात्रातील नववा दिवस साजरा होणार आहे. या दिवशी नवदुर्गांमधील अखेरचे रूप सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते.

+
नवरात्र

नवरात्र नववी माळ: देवी सिद्धिदात्रीला कोणती माळ अपर्ण करावी व नैवेद्य काय? जाणून

मुंबई : पाहता पाहता नवरात्राचे आठ दिवस संपले आणि आता 30 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रातील नववा दिवस साजरा होणार आहे. या दिवशी नवदुर्गांमधील अखेरचे रूप सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या स्वरुपाची आराधना केल्याने भक्तांना सर्व सिद्धी, कीर्ती, संपत्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. दसर्‍याच्या दिवशी नवरात्राची सांगता होते, मात्र सिद्धिदात्री देवीची उपासना ही नवरात्रीचा समारोप मानला जातो. देवी सिद्धिदात्रीची पूजाविधी आणि या दिवशी देवीला कोणता नैवेद्य आणि कोणती माळ अर्पण करावी याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सिद्धिदात्री देवीचे स्वरूप
सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान असून तिच्या चार हातांत कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र आहे. हे स्वरूप सरस्वती देवीचेही प्रतीक मानले जाते. देवी ही सर्व आठ सिद्धींची अधिष्ठात्री आहे. अणिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, गरिमा, लघिमा, इशित्व आणि वशित्व. पुराणानुसार भगवान शंकरांनी सिद्धिदात्री देवीच्या कृपेनेच या सिद्धी प्राप्त केल्या आणि त्यामुळे ते अर्धनारीश्वर म्हणून ओळखले गेले.
advertisement
पूजन पद्धत
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
देवीच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालून पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.
मातेला पांढरे फुल अर्पण करून हळद-कुंकू वाहावे.
देवीला मिठाई, सुका मेवा, हंगामी फळे, पुरी, खीर, हलवा, हरभरा आणि नारळ अर्पण करावेत.
advertisement
या दिवशी देवीला विशेषतः लोण्याचा नैवेद्य अर्पण करावा.
फुलांसोबतच देवीला लिंबाची माळ अर्पण करण्यालाही धार्मिक महत्त्व आहे.
नवरसयुक्त अन्न, नऊ प्रकारची फुले आणि नऊ प्रकारची फळे अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
नवमीच्या दिवशी कन्या पूजन आणि हवन यालाही विशेष महत्त्व आहे.
सिद्धिदात्री देवीची भक्तिभावाने केलेली उपासना साधकाला अष्टसिद्धी आणि नव निधींचा लाभ करून देते.
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीची नववी माळ: संपत्ती होईल प्राप्त, देवी सिद्धिदात्रीची अशी करा पूजा
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement